अखेरीस जियो ऑफिशियली लॉन्च, याहून स्वस्त 4G नाही मिळणार..

अखेरीस जियो ऑफिशियली लॉन्च, याहून स्वस्त 4G नाही मिळणार..

गेले अनेक महिने येणार-येणार म्हणून चर्चेत असणाऱ्या रिलायन्स जिओचा आज ऑफिशियल लॉन्च झालेला आहे. रिलायन्सच्या शेअर होल्डर्सच्या मिटींगमध्ये मुकेशभाई अंबानींनी याची घोषणा केली. तुम्हाला "कर लो दुनिया मुठ्ठी में" आठवतंय? तेव्हा कसे रिलायन्सने मार्केटला झुकवलं होतं अगदी तशीच तयारी आता पण चालू आहे. 31 डिसेंबर पासून खालील प्लॅन अंमलात येणार आहेत...

 

500 रुपयांमध्ये, मोफत फोन कॉल्स, एस एम एस, 4GB डेटा, रात्री डेटा फ्री, पब्लिक वाय-फायवर 8 जीबी डेटा. इतकंच नाही तर रिलायन्सने गाणी, मुव्हीज स्ट्रीम करणारी ऍप्स बनवली आहेत. त्याचा पण ऍक्सेस फ्री असणार आहे. अर्थात नेटवर्कची क्वालिटी काय असणार हे थोड्या दिवसात कळेलच...