लहानपणी शाळेत गुरुजींच्या हातात आपण खडू पाहायचो, कधी कधी आपणही तो वापरायचो. पण याच खडूला कोरुन त्याला आगळंवेगळं रूप देणारा एक अवलिया आहे, त्याचं नाव आहे सचिन संघे.
कर्नाटकातील मुदूगेरी या लहान गावातील सचिन लहानपणापासूनच खडूपासून वेगवेगळी शिल्पे बनवतो. या कलेला त्याने 'चॉकृती' असं नाव दिलंय. यासाठी त्याने कोणतंही शास्त्रीय प्रशिक्षण घेतलेलं नाही. पण खडूमध्ये वेगवेगळी शिल्पे, थीम्स तो सुईच्या साहाय्याने लीलया साकारतो.





