जगापासून लपवावं (शब्दशः) असं सनी लिओनकडे काहीच नाही.गेल्या दोन वर्षात गुगलवर अधिकतम शोधला गेलेला शब्द म्हणजे सनी लिओन. आज आपण बघू या ,सनी लिओनचा जगाने न बघितलेला एक धूर्त व्यावसायिकेचा चेहेरा. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ती म्हणते, " मी "त्या" फिल्म बनवणे बंद केले आहे हे बर्याच जणांना माहिती नाही. मी "सनी लिओन" आता फक्त एक ब्रँड आहे."
या ब्रँडखाली सनीने नुकतीच 'लस्ट' या सुगंधाची निर्मिती केली आहे. या नंतर अनेक सौंदर्य प्रसाधनांची निर्मितीही ती करणार आहे. 'बिगबॉस'मध्ये किंवा बॉलीवुडच्या जिस्म२ मध्ये काम करण्याचा धोका मोजूनमापून घेतला होता असे सांगताना ती म्हणते की, " 'माझा बिग बॉसचा सहभाग अनिश्चितच होता. भारतात माझा तिरस्कार करणार्या लाखो पत्रांचा मला सामना करावा लागेल याची मला कल्पना होती. पण नंतर माझ्या लक्षात आले की, दहा देशांत अडीच कोटींचा प्रेक्षक वर्ग असलेल्या कार्यक्रमासाठी नकार देणे ही मोठी घोडचूक होईल आणि मग मी भारतात आले. "
कमावलेल्या पैशाच्या विनियोगाबद्दल बोलताना ती म्हणते " व्यवसाय करताना एका वेळी एक पायरी या पध्दतीने मी काम करते. माझ्या नवर्यासोबत कंपनी बनवताना पण मी दहा वेळा विचार केला आणि मगच आमची भागीदारी सुरु केली." सुगंध आणि सौंदर्य प्रसाधने यांशिवाय तिचे "तीन पत्ती" हे गेमिंग अॅप पण आहे. या नंतर सिनेनिर्मितीची सुरुवात करण्याचा तिचा विचार आहे.
हे सगळे करताना सनीने निवृत्तीच्या आर्थिक योजना पण तयार केल्या आहेत. तिने बहुतेक सगळे पैसे अमेरीकन शेअर बाजारात आणि म्युच्युअल फंडात गुंतवले आहेत.भारतासुध्दा गुंतवणूक करण्याची तिची इच्छा आहे. मूळ भारतीय वंशाच्या अनिवासी भारतीयांना कायद्याचे अनेक अडथळे आहेत. त्यामुळे सध्या तरी ते शक्य नसल्याचे ती म्हणते. हे सगळे वाचल्यावर तुमच्या लक्षात आलेच असेल की सनी लिओनचा वरचा मजला पण भरलेला आहे.
