वारीच्या अभंगामध्ये आज आम्ही घेऊन आलो आहोत एक वेगळा प्रयोग. अभंगांबद्दल लिहिताना आपल्या अजय-अतुल यांनी ’लै भारी’ चित्रपटासाठी केलेले ’विठ्ठल विठ्ठल’ हे गीत यायलाच हवं होतं. या गीतासोबत पाहा प्राजक्ता धुळप यांनी आयफोन ६ वरती शूट केलेला या वर्षीच्या वारीचा स्लोमोशन व्हिडिओ. वारी म्हणजे समस्त वारकर्यांसाठी एक पर्वणीच असते. वारीत घातलेल्या फुगड्या, टाळ-मृदंगाचा गजर आणि सोबत भजनांची साथ.
कामामुळे सगळ्यांचीच वारी घडते असे नाही. चला, आज आनंद घेऊया या ई-वारीचा.
