आयफोन ७ बनवायला लागतात फक्त १५ हजार : आपण देतोय ६० हजार !! 

आयफोन ७ बनवायला लागतात फक्त १५ हजार : आपण देतोय ६० हजार !! 

जगातला प्रत्येक आयफोनवेडा माणूस प्रत्यक्षात वेडाच असतो की काय अशी शंका त्याचं आयफोनप्रेम पाहून आपल्याला येऊ शकते. कारण हे लोक वाट्टेल ती किंमत मोजून आयफोन खरेदी करायला तयार असतात. आता हेच बघा ना. नवीन लॉन्च झालेला आयफोन ७ बनवण्यासाठी खर्च येतो १५ हजार आणि आपण तो खरेदी करणार आहोत ६० हजाराला !! 

रिसर्च कंपनी IHS Markit ने ही आकडेवारी सादर केलीय. यानुसार एक आयफोन ७ बनवण्यासाठी फक्त १४,७३१ रु. खर्च होतात. यातील डिस्प्ले सर्वात महाग म्हणजे २,८८२ रुपयांचा आहे. यानंतर यातली इंटेलच्या चिप्स आणि मोडेमची किंमत २,२७२ रुपये आहे. आयफोन मध्ये बसवलेल्या A10 फ्युजन क्वाड कोअर चिपची किंमत ₹ १,७४२ आहे. 

आयफोन मधील सगळ्या सेन्सर्सची किंमत - ९३८ रुपये 

2 GB रॅम आणी 32 GB फ्लॅश स्टोअरेजची किंमत - १,०९९ रुपये. 

रिअर आणि फ्रंट कॅमेरा - १,३३३ रुपये. 

अॅन्टेना, कनेक्टर्स, स्टेरिओ स्पीकर्स, मायक्रोफोन्स - १,११९ रुपये. 

एकंदरीत बेसिक प्रोडक्शन कॉस्ट धरून ही किंमत ₹ १५,०६७ पर्यंत जाते. आणि आपण तो खरेदी करतोय ६०,००० रुपयात..  अशी उगाचच नाही बनली अॅपल 'जगातील सर्वात श्रीमंत कंपनी !'