आजकाल कुठेही गेलं की फोटो काढायला फोन-कॅमेरे सरसावतात. बरेचदा फोटो काढण्याच्या नादात मूळ गोष्टीचा आस्वाद घेणं राहून जातं. मग डोळ्यात आपोआप दिसणारी गोष्ट टिपणारं आणि हवं तेव्हा ते परत दाखवणारं तंत्रज्ञान आलं तर? मानवाला असलेला विस्मरणाचा शाप पुसून जाईल. आनंदाचे, आपुलकीचे, आवडत्या माणसांसोबतचे क्षण सहजरीत्या साठवून ठेवता येतील. स्टिंग ऑपरेशन करणार्या लोकांचं काम सोपं होईल, आणि बरंच काही होईल.
जगप्रसिद्ध सोनी कंप्नी बनवतेय व्हिडिओ रेकॉर्डिंग करणारी कॉन्टॅक्ट लेन्स. या लेन्सवरच्या सर्किट्मुळे व्हिडिओ रेकॉर्ड तर करता येतीलच, आणि ते पुन्हा पुन्हा पाहाता ही येतील.
Smart Contact LensesThese contact lenses can record and play back video
Posted by Alex Klokus on Tuesday, April 26, 2016
पण खरं सांगायचं तर त्यामुळं माणसांच्या व्यक्तीस्वातंत्र्यावरती मोठा घाला येईल. कटू घटना परत-परत पाहून त्यावरून लोकांशी सतत वाद आणि भांडणं होऊ शकतील. आपल्याला कुणी रेकॉर्ड तर करत नाही ना, या भयाच्या छायेखाली सतत वावरावं लागू शकेल.
अर्थात , असं करता येईल का ही संकल्पना नवीन नाही. ’ब्लॅक मिरर’ या ब्रिटिश मालिकेने ’द एंटायर हिस्ट्री ऑफ युवर्स’ या भागात ही संकल्पना आणि तिचे दुष्परिणाम आधीच दाखवून झाले आहेत. हेच नव्हे तर भविष्यातल्या आणखी काही तांत्रिक शोधांचा मानवी जीवनावर काय परिणाम होईल हे ही त्यांनी सांगोन झालंय. मराठीतून वाचा ’ब्लॅक मिरर’ बद्दल अधिक माहिती.
