आपल्या प्रत्येकासाठी एखादा पदार्थ असा असतोच, ज्याच्यासाठी माणूस अर्ध्या रात्री पण उठू शकतो. त्यातल्या त्यात चिकन तर काही लोकांसाठी जीव की प्राण असते. रोज जरी चिकन असले तरी नाही म्हणणार नाहीत अशी लोक देखील सापडू शकतात.
तैवान मध्ये मात्र चिकनप्रेमाची हद्दच झाली आहे. तैवान मधला चिऊ नावाचा तरुण ६२ दिवसांपासून कोमात होता. तो आज ना उद्या बाहेर येईल या आशेवर त्याचे कुटुंब होतं. पण जे डॉक्टरांना जमलं नाही ते एका चिकनने करून दाखवलं. त्याच्या कानावर एकदा फक्त चिकन हा शब्द गेला आणि तो कोमातून खडबडून जागा झाला.






