तुम्हाला सारखासारखा शर्ट इन करावा लागतो का ? मग हा तुमच्यासाठी परफेक्ट उपाय आहे !!

तुम्हाला सारखासारखा शर्ट इन करावा लागतो का ? मग हा तुमच्यासाठी परफेक्ट उपाय आहे !!

आधी  मी खूप त्रासलेला असायचो, दिवसातून असंख्य वेळा शर्ट पँटमध्ये खोचून खोचून मी वैतागून जायचो. शर्ट इन ठेवणे हे माझ्या आयुष्याचं सगळ्यात महत्वाचं काम झालं होतं, माझे मित्र मला चिडवायला लागले होते. पण मग माझ्या आयुष्यात टेलीब्रॅंड नाही तर इंटरनेट आलं...

स्रोत

काय भाऊ तुला पण असला प्रॉब्लेम आहे का? मला तर दिवसभर इन टिकनाऱ्या लोकांचं फार कौतुकच वाटतं. पण आता तुझ्या-माझ्यासारख्या इन न टिकनाऱ्या लोकांसाठी एक लै भारी उपाय सापडला आहे.  निक वेन या स्लोव्हेनियन माणसाला पण आपल्याचसारखा प्रॉब्लेम होता. त्याने NV Holder  नावाची एक ऍक्सेसरी शोधून काढलीय.  या एन व्ही होल्डरमध्ये तीन मेटल पट्टे  असतात आणि ते इलॅस्टिक शर्टाला एका पोझिशनमध्ये धरून ठेवतात. आपल्या शरीराच्या हालचालीनुसार इलॅस्टिक शर्टाला नीट आपल्याला हव्या त्या पोझिशनमध्ये ठेवतं.

स्रोत

या लै भारी शोधाची सध्याची किंमत आपल्याला न परवडणारी अशीच म्हणजे 34 डॉलर आहे. पण याचं डिझाईन बघता भारतात पण असे शर्ट होल्डर तयार करायला वेळ लागणार नाही.