जगातल्या पॉवरफुल महिलांच्या यादीत कोणत्या भारतीय स्त्रियांनी स्थान पटकावलंय हे तर पाहून घ्या!

जगातल्या पॉवरफुल महिलांच्या यादीत कोणत्या भारतीय स्त्रियांनी स्थान पटकावलंय हे तर पाहून घ्या!

जगभरात महिलाराज विविध क्षेत्रात वाढत आहे. भारत यात मागे राहील असे होणे शक्यच नाही. भारतातील महिलांचा विविध क्षेत्रात सहभाग हा इतर देशांच्या मानाने अधिक राहिला आहे. नुकतीच फोर्ब्सने जागतिक पॉवरफुल महिलांची यादी घोषित केली आहे. यात अनेक महिलांनी स्वतःचे स्थान पक्के केले आहे.

७ डिसेंबरला फोर्ब्सने जगभरातील विविध क्षेत्रातील १०० सर्वाधिक पॉवरफुल महिलांची यादी प्रसिद्ध केली आहे. यात जगभरातील राज्यकर्त्या महिला, उद्योगपती महिला, समाजसेवा करणाऱ्या महिला यांचा समावेश आहे. भारतीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा या यादीत सलग तिसऱ्या वर्षी या यादीत समावेश झाला आहे.

यावर्षी निर्मला सीतारामन या ३७ व्या क्रमांकाच्या सर्वाधिक पॉवरफुल महिला ठरल्या आहेत. निर्मला सीतारामन भारताच्या पहिल्या पूर्णवेळ अर्थमंत्री आहेत. सीतारामन यांच्या व्यतिरिक्तही भारतीय महिला या यादीत समाविष्ट झालेल्या आहेत.

एचसीएल कॉर्पोरेशनच्या सीईओ रोशनी नाडर- मल्होत्रा या यादीत ५२ व्या क्रमांकावर आहेत. एचसिएल कंपनीचे शिव नाडर यांनी कंपनीची सूत्रे आपल्या मुलीच्या हातात सोपवली आहेत. बायोकॉन एक्झिक्युटिव्हच्या चेअरपर्सन किरण मुझुमदार शॉ या ५२ व्या क्रमांकावर आहेत.

नायका फाउंडेशनच्या संस्थापक फाल्गुनी नायर या ८८ व्या क्रमांकावर आहेत. तर फोर्ब्सच्या या यादीत जगात सर्वाधिक पॉवरफुल महिला या मॅकेंझी स्कॉट या ठरल्या आहेत. स्कॉट या कादंबरीकार आणि सामाजिक कार्यकर्त्या आहेत.

थोडक्यात, पॉवरफुल माहिलांचा टक्का वाढतोय आणि ही अत्यंत अभिमानास्पद गोष्ट आहे!!

उदय पाटील