गाडी म्हणजे त्यात इंजिन असणार हे आपण गृहीतच धरतो. पण आता भारतात पहिल्यांदाच चक्क इंजिनविरहित ट्रेन धावणार आहे. या ट्रेनचं नाव आहे ट्रेन-१८. २०१८ मध्ये बनवण्यात आल्याने नावात ‘१८’ क्रमांकाचा समावेश आहे.
आजवर इंजिनविरहित ट्रेन्स मेट्रो नेटवर्कचा भाग म्हणून फक्त मोठ्या शहरांमध्ये धावायच्या, पण आज पासून पहिल्यांदाच इंजिनविरहित सेमी-हाय स्पीड ट्रेन शहरांतर्गत धावणार आहेत. ट्रेन-१८ ची आजपासून तपासणी सुरु होईल. तपासणी पूर्ण झाल्यावर ट्रेनला प्रवाशांच्या सेवेत रुजू करण्यात येईल. ट्रेन-१८ जर परीक्षणात पास झाली तर भविष्यात राजधानी आणि शताब्दीसारख्या ट्रेन्सची जागा येईल.







