आपल्या अन्नात विष कालवणार कोण ? आपणच आणि दुसरं कोण ! पृथ्वीच्या पाठीवर माणसासारखा मूर्ख प्राणी मिळणार नाही. भूक मोठी म्हणून उत्पादन जास्त हवं उत्पादन, वाढवायचं म्हणून रसायनं वापरायची, रसायन पोटात गेलं की आजारी पडायचं ! गेल्या आठवड्यातील अमेरिकेत गाजणारी चर्चेत असलेली ही बातमी बघा !
गेल्या आठवड्यात आलेल्या एका बातमीची चर्चा अमेरिकेत सर्वत्र चालू आहे. नाही, या चर्चेचा विषय शाळेत झालेला गोळीबार ,अतिरेकी, अणवस्त्र, डोनाल्ड ट्रंप याबद्द्ल नाही. ही चर्चा सिरीअल ब्रेकफास्ट म्हणजे लहान मुलांच्या न्याहारीबद्दल आहे. हा विषय आपल्याकडे थेट चर्चेत येण्याची शक्यता फार कमी आहे. कारण आपल्याकडे न्याहारीला सिरीअल ब्रेकफास्ट खायची सवय नाही.







