सोशल मीडियावर इतर अनेक गोष्टींबरोबर प्रचंड वायरल होणारी गोष्ट म्हणजे ऑप्टिकल इल्युजन. लोकांना डोक्याचा भुसा करणाऱ्या गोष्टी आवडतात हेच यातून सिद्ध होते. वर्तमानपत्रातले कोडे सोडवणाऱ्यांची संख्या कमी नव्हती. सध्या डिजिटल युगात त्याची जागा ऑप्टिकल इल्युजन म्हणजेच दृष्टीभ्रमाने घेतली असे म्हणता येईल.
सध्या असेच एक ऑप्टिकल इल्युजन लोकांना कोड्यात टाकत आहे. हे इल्युजन चांगलेच वायरल झाले असून उत्तर शोधण्यासाठी लोकांना चांगलीच डोक्यालिटी लढवावी लागत आहे. यात एक फोटो आहे, ज्यात नेमके किती घोडे आहेत हे लोकांना ओळखायचे आहे.
पण हा फोटो साधासुधा नाही. कारण बॅकग्राऊंड असो, जमीन असो की घोडे, सर्वांचा रंग सारखाच दिसत आहे. यामुळे यात नेमके किती घोडे आहेत हे शोधण्यासाठी भल्याभल्यांची तारांबळ उडताना दिसत आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एनवायर्नमेंटल हेल्थ सायन्स यांच्या वेबसाईटवर हा फोटो पोस्ट करण्यात आला आहे.
आता या घोड्यांचा रंग तांबडा आहे तर त्यावर तांबडे पट्टे आहेत. बॅकग्राऊंडचा रंग मिळताजुळता असल्याने लोकांचा कस लागत आहे. वॉटरमार्कवरून हा फोटो १९७८ सालातील बेव डुलीटल यांचा वाटत आहे. या वेबसाईटने याचे सोल्युशन दिले आहे. त्यांच्या वैज्ञानिकानुसार या फोटोत सात घोडे आहेत. त्यातले काही अर्धवट दिसत आहेत. पण जास्तीत जास्त लोकांना फक्त ५ घोडे दिसतात.
तुम्ही या फोटोचे निरीक्षण करून आम्हाला कॉमेंटबॉक्समध्ये कळवा की नेमके किती घोडे या फोटोत आहेत.
उदय पाटील
