राहुल द्रविड म्हणजे शांतीचा पुतळाच जणू! मैदानावर तासंतास खेळत असताना त्याच्या चेहऱ्यावर थोडी देखील चिडचिड दिसायची नाही. त्याच्या शांत स्वभावाचे अनेक किस्से सांगितले जातात. काल परवा द्रविडने एक ऍड केली ज्यात त्यांचा रागीट लूक बघायला मिळाला. द्रविडला कधीही या मूडमध्ये बघितले नसल्याने त्या ऍडची चांगलीच चर्चा झाली.
द्रविड हा खऱ्या अर्थाने एकही ‘हेटर’ नाही असा खेळाडू आहे. मैदानावर आणि मैदानाबाहेर देखील तो कमालीच्या शांत चित्ताने वावरत असतो. पण द्रविडला देखील संताप आलेला आहे. चला तर आज द्रविडला खरोखर राग आल्याचे किस्से जाणून घेऊ.






