स्मार्टफोनची सुरक्षा खूप महत्वाची असते. कारण त्यात आपली सर्व महत्वाची माहिती असते. याच गोष्टीचा फायदा घेऊन हॅकर्स अधूनमधून नवनवीन मालवेयर निर्माण करून तुमच्या मोबाईलमध्ये घुसवण्याचा प्रयत्न करत असतात. त्यातही बहुतेक लोकांकडे अँड्रॉईड फोन्स असतात, त्यामुळे त्यावर हॅकर्सचा डोळा असतो.
सध्या Threatfabric नावाच्या सिक्युरिटी फर्म ने ब्लॅकरॉक नावाच्या एका नव्या मालवेअरबद्दल लोकांना धोक्याचा इशारा दिला आहे. हे मालवेअर अमेझॉन, टिंडर, जीमेलसह एकूण ३७७ ऍप्सममधून क्रेडिट कार्ड आणि पासवर्डची माहिती चोरतो.







