सोशल मीडियाच्या महाजालात अचानक काय व्हायरल होईल ते सांगता येत नाही. गेल्या काही दिवसांपासून #sixwordstory ट्रेंड करतंय. तसं दिसायला प्रकरण सोपं आहे. तुमच्या स्टेटसमध्ये सहा शब्दांमध्ये कथा सांगायची आहे. पण हे वाटते तेवढे सोपं नाहीए बरं का! मोठमोठ्या लोकांना हे जमतंय असेही नाही. खरंतर बऱ्याच लोकांना आपण काय लिहितोय ते पण कळत नाही.
कशी झाली सुरुवात?
प्रसिद्ध अमेरिकन लेखक अर्नेस्ट हेमिंग्वे एकदा बार मध्ये बसलेले असताना त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना एक आवाहन दिले. तू एवढा महान लेखक आहेस तर लिहून दाखव सहा शब्दात कथा. त्यावर त्यांनी उत्तर दिले, "For sale: baby shoes, never worn." इथून सुरवात झाली सहा शब्दाचा कथेला....
का करतय हे ट्रेंड?
2 जुलैला हेमिंग्वेची पुण्यतिथी आहे. त्या निमित्ताने हे प्रकरण पुन्हा वर आले आहे. मराठीतही ट्विटर आणि फेसबुक दोन्ही ठिकाणी सहा शब्दांच्या या कथा लिहिल्या जात आहेत. तर पाहूयात त्यातल्याच काही
भाषण तेच रटाळ, पण मार्केटिंग जोरात..#sixwordstories
Posted by Ajay Maktedar on 9 जून 2016
विकणे आहे... अत्याचारग्रस्त गावचा.. तंटामुक्तगाव पुरस्कार.. #sixwordstories
Posted by Vaibhav Chhaya on 9 जून 2016
माती .. लागवड .. ढोरमेहनत .. तोडणी .. मार्केट .. माती #SixWordStories
Posted by Suhas Bhuse on 9 जून 2016
तू मी मी तू नको आपणच #sixwordstories
Posted by Amita Darekar on 9 जून 2016
तिने लाइक करताच पिंडाला कावळा शिवला ! #SixWordStories
Posted by Shankar Bahirat on 9 जून 2016
आता ह्या शेवटच्या #Sixwordstories १.ओठांचा मागितला तर बटाट्यांचा किस दिला २.अख्ख्या श्रावण महिन्यात तिला राखीपौर्णिमा ...
Posted by विजय तरवडे on 9 जून 2016
सिंचन पाईपलेस 2G टेंडरलेस भारत काँग्रेसलेस #sixwordstories
Posted by Chaitanya Tamhankar on 9 जून 2016
अक्षता हाती माझ्या अन् तु बोहल्यावर #sixwordstories
Posted by Prashant Sanas on 9 जून 2016
सकाळ झाली, रातराणी कोमेजून गेली होती #sixwordstories
Posted by अनिरुद्ध जाधव on 9 जून 2016
#sixwordstories . मैत्रीन म्हनली पोटात दुकतंय, मी भेलो. . ( .............. हॉरर ष्टोरी )
Posted by Vijaykumar Khadang on 9 जून 2016
