निरोगी आयुष्यासाठी शरीराची स्वच्छता सर्वात महत्वाची मानली जाते. त्यामुळे अगदी लहानपणापासूनच सर्वांना अंघोळीची सवय असते. शरीराची दुर्गंधी जातेच, तसेच शरीरावरील जीवजंतूही मरतात. गरम पाण्याने आंघोळ केल्याने ताजेतवाने वाटते. पण तुम्ही अनेकदा अनुभवले असेल की आंघोळीनंतर घाम येतो. टॉवेलने अंग स्वच्छ पुसल्यावर घाम येतो. थोडा घाम येणे स्वाभाविक आहे, पण या घामामुळे परत अस्वच्छ वाटते. हा घाम का येतो? आणि तो टाळण्यासाठी काय काळजी घेता येईल हे आपण समजून घेऊयात.
एका वैद्यकीय अहवालानुसार, आंघोळीनंतर येणारा घाम अतिरिक्त साठलेल्या उष्णतेमुळे येतो. म्हणजे आंघोळ झाल्यावर गरम पाणी आपल्या त्वचेला आणि केसांना चिकटून राहते. त्या थेंबामुळेच घाम येऊ लागतो. मग ते कोरडे करण्यासाठी तुम्ही टॉवेलने लगेच अंग पुसून काढता. त्यामळे पाणी पुसले जाते, पण टॉवेलच्या घर्षणाने त्वचा अधिक उष्णता निर्मात करते. तसेच बाथरूममध्ये गरम पाण्यामुळे आद्र्रता तयार होत असते, हे कारणही घाम येण्यास मदत करते. या आद्रतेचे उदाहरण म्हणजे आंघोळीनंतर बाथरूममधला आरसा पूर्णपणे धुरकट दिसतो. याचेही कारण अतिरिक्त वाढलेली उष्णता. बाहेर आल्यावरही घाम येत राहतो.






