मुख्यमंत्र्यांच्या तणावपूर्ण आयुष्यात आठवून आठवून गुदगुल्या करणारे क्षण अभावानेच येतात पण कर्नाटकाचे मुख्यमंत्री सिद्दरामय्या यांना मात्र एका ललनेने सुखद धक्का दिला. जिल्हा परिषद आणि तालुका पंचायतीत निवडून आलेल्या पक्ष सभासदांच्या सत्कार समारंभात गिरीजा श्रीनिवास या महिलेने चक्क मुख्यमंत्री सिद्दरामया यांच्या गालाची पप्पी घेतली. बिचारे मुख्यमंत्री क्षणभर बावरले पण नंतर त्यांच्या राजकारणी तात्काळ जागा झाला आणि गिरीजा माझ्या मुलीच्या वयाची आहे असे म्हणून त्यांनी या खळबळीतून स्वत:ला सोडवून घेतले आणि का नाही?.. सिद्दरामया सदुसष्ट वर्षाचे आहेत .
या प्रसंगाने इतर राज्यांच्या तरुण तडफदार मुख्यमंत्र्यांच्या आशा पात्र पल्लवीत झाल्या असतील आणि ते विचार करत असतील "मेरा नंबर कब आयेगा"?
असो . या आधीची अशी गाजलेली प्रकरणे म्हणजे बर्याच वर्षापूर्वी इंग्लडच्या राजपुत्राची - प्रिन्स चार्लस -यांची पद्मिनी कोल्हापूरे यांनी अचानक घेतलेली पप्पी आणि क्रिकेटच्या पिचवर ब्रिजेश पटेलचा एका मुलीनी घेतलेला मुका !
