भाऊ मोदींची हवा फक्त इंडियात हाय असं म्हणणाऱ्यांसाठी आम्ही आज हा व्हिडीओ घेऊन आलोय. मोदींच्या परदेश दौऱ्याविषयी अनेकदा टिंगल केली जाते पण परदेशात त्यांच्याकडे कोणत्या नजरेनं पाहिलं जातं हे दाखवणारा हा व्हिडीओ आहे. मोदींची फक्त भारताचे पंतप्रधान म्हणून ओळख नसून आणखी बऱ्याच गोष्टींनी ते चर्चेत हायत.
तर असं आहे मंडळी की ‘रिक्षावाली’ नावाच्या एका युट्युब चॅनेलनं स्पेनमधल्या ‘इबिझा’ या लहानश्या बेटावर राहणाऱ्या नागरिकांना नरेंद्र मोदींविषयी विचारलं आणि काय आश्चर्य इथे तर मोदींची फुल टू हवा दिसतीये. काही जण तर त्यांना योगासाठी ओळखतात तर काहींनी तर त्यांना एक पॉवरफुल लीडर म्हटलं. एवढंच नाही काहींनी तर ट्रम्प आणि नरेंद्र मोदींची तुलना करत असही म्हटलं की नरेंद्र मोदी ट्रम्पला एक पंच (थोबाडीत) मारू शकतात. हाईट तर तेव्हा झाली जेव्हा एकजण नरेंद्र मोदींना ‘गांधी’ म्हणून गेला. ही माणसं म्हणजे अगदी थोरचं.
पण काहीही म्हणा राव स्पेनमधल्या लहानश्या ठिकाणी देखील मोदी जाऊन पोहोचलेत हे बघून आपली कॉलर अभिमानाने टाईट होते.
आता वाचत काय बसलाय...बघा हा व्हिडीओ मायला...




