काय घड्तंय अफगाणीस्तानमध्ये ? जाणून घ्या - काबूल एक्सप्रेस भाग १
अनेक साम्राज्यांचे कब्रस्तान अफगाणीस्तान- वाचा : काबूल एक्सप्रेस भाग -२
अफगाणिस्तानची लोकसंख्या तीन कोटीच्या आसपास आहे. अफगाणिस्तानचं जीडीपी ७२ अब्ज आहे. महाराष्ट्राची लोकसंख्या पावणेबारा कोटी आहे आणि महाराष्ट्राचं जीडीपी ४५० अब्ज डॉलर आहे. लोकसंख्येच्या हिशोबात महाराष्ट्र ३.७५ पट आणि पैशाच्या जमा हिशोबात ६ पट मोठा असूनही जगभर अफगाणिस्तानची चर्चा होते. मग अफगाणिस्तानला जगाच्या हिशोबात इतकं महत्व कां आहे?
प्रश्न रास्त आहे. पण जगाचं राजकारण आणि जग समजून घेतलं की या प्रश्नाची उत्तरं सहज मिळतात.





