पादणं काही समाजात चांगलं समजलं जात नाही. पण त्याचं काय आहे, की पाद थांबवता येत नाही. कधीतरी चित्रविचित्र आवाज करत वायू त्याला जागा मिळेल तिथून बाहेर पडतोच. आजूबाजूचे नाकाला हात लावतात आणि पादणार्याचं हसं होतं. आपल्या घरात पादण्यात प्रसिद्ध असलेले किमान एखादा काका किंवा आजोबा असतातच आणि ते या हसणार्यांच्या पलिकडे गेलेले असतात. तुम्ही निंदा किंवा वंदा, त्यांचा असतो पादण्याचा धंदा...
पण पादणं हा शरीरधर्म आहे, अगदी तहान-भुकेसारखाच.. खरंतर पादणं हे आरोग्यासाठी चांगलं आहे आणि त्यातून आपल्या शरीरात काय उलथापालथ होतेय, ती चांगली आहे की वाईट याबद्दल बरीच माहिती मिळते. आज पाहूयात पादण्याचे सात फायदे..








