कायद्याची पुस्तके ही जाडजूड असतात हे ज्यांनी वकिलीचा अभ्यास केला किंवा ज्यांचा वकिलांशी संबंध आला असेल, त्यांना नक्कीच माहीत असेल. कायदेशीर बाबींवर प्रभुत्व असायला हवे तर या जाडजूड पुस्तकांचा अभ्यास करणे भाग आहे. आता या जाडजूड पुस्तकांची किंमत पण काय कमी जाडजूड नसते.
जास्त म्हटले तरी शेवटी पुस्तकाची किंमत होऊन होऊन किती जास्त असेल हा विचार कोणीही करू शकतो. एक पुस्तक मात्र तब्बल १२ लाख रुपये किमतीचे आहे, ज्यावरून ते चांगलेच चर्चेत आले आहे.


