सध्या प्रत्येकाच्या तोंडी एकच विषय आहे… गॅस आणि पेट्रोलियम पदार्थांच्या वाढलेल्या किमती! खरंतर आपण या ऊर्जेच्या साधनांवर इतके अवलंबून आहोत की, यांची किंमत कमी जास्त झाली तर आपल्या दैनंदिन आयुष्यावर त्याचा सरळ परिणाम होतो. या नैसर्गिक ऊर्जेच्या स्रोतांचा साठा दिवसेंदिवस झपाट्याने कमी होतोय. या धोक्याबाबत जगातील सगळ्या देशांचे भूगर्भशास्त्रज्ञ कानी कपाळी ओरडून सांगत असताना आपण मात्र तिकडे दुर्लक्ष करत आहोत. असो!
तर कधी विचार केलाय का की, जमिनीच्या आत असणारे हे ऊर्जेचे साठे मुळात शोधले कसे जातात? नाही ना? चला तर मग या लेखातून समजून घेऊया की पृथ्वीच्या अगदी आत असणारे पेट्रोलियमचे साठे नेमके कुठे दडून बसले आहेत हे शास्त्रज्ञ शोधतात तरी कसे…







