दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार एबी डिव्हिलिअर्सने काल धक्कादायक निर्णय घेतला राव. त्याने अचानक आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्त होण्याची घोषणा केली आहे. या घोषणेने साऱ्या क्रिकेट रसिकांना प्रचंड मोठा धक्का बसला. त्याचे जितके चाहते दक्षिण आफ्रिकेत नसतील त्यापेक्षा जास्त भारतात आहेत. त्याने भारताविरुद्ध अनेकदा सामने खेळले असले तरी तो भारतीयांचा लाडका ठरलेला आहे.
त्याने निवृत्तीच्या निर्णयावर ‘आपण आता थकलोय’ असं स्पष्टीकरण दिलं असलं तरी ते फारसं कोणाला रुचलेलं नाही. त्याने नुकतीच आयपीएलच्या सामन्यात जी अफलातून कामगिरी केली त्यावरून तो कुठूनही थकलेला वाटत नाही.
I’ve made a big decision today pic.twitter.com/In0jyquPOK
— AB de Villiers (@ABdeVilliers17) May 23, 2018
मंडळी, काहीही असलं तरी आपला लाडका मिस्टर ३६० आता क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्त होतोय. त्याची झंझावाती कामगिरी आपल्या सगळ्यांच्याच लक्षात राहील.
चला तर मंडळी आज या निमित्ताने क्रिकेटच्या विश्वात अविस्मरणीय ठरलेल्या एबी डिव्हिलिअर्स बद्दल १० रंजक गोष्टी जाणून घेऊया.










