टी -२० तील टॉप ३ सुपर फ्लॉप कर्णधार, या कर्णधारांनी गमावले आहेत सर्वाधिक सामने

टी -२० तील टॉप ३ सुपर फ्लॉप कर्णधार, या कर्णधारांनी गमावले आहेत सर्वाधिक सामने

 टी-२० क्रिकेट हा क्रिकेटमधील सर्वात छोटा फॉरमॅट आहे. या फॉरमॅटमध्ये विजय मिळवण्यासाठी शेवटच्या षटकापर्यंत संघर्ष करावा लागतो. अनेकदा शेवटच्या चेंडूवर सामन्याचा निकाल लागत असतो. हा सर्वात छोटा फॉरमॅट असल्यामुळे कर्णधाराकडे रणनिती आखण्यासाठी खूप कमी वेळ असतो. मोजकेच कर्णधार आहेत ज्यांनी ही जबाबदारी योग्यरित्या पार पाडली आहे. तर काही कर्णधार असेही आहेत ज्यांच्या नावे टी -२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने गमावण्याचा विक्रम आहे.

१) एमएस धोनी (Ms Dhoni) :

भारतीय संघाचा माजी कर्णधार हा क्रिकेट इतिहासातील सर्वोत्कृष्ट कर्णधारांपैकी एक आहे. त्याच्या नावे सर्वाधिक सामने जिंकण्याचा विक्रम आहे. तसेच सर्वाधिक सामने (Most matches lost as a captain in T20) गमावण्याचा विक्रम देखील एमएस धोनीचा नावे आहे. एमएस धोनीने टी -२० आंतरराष्ट्रीय आणि आयपीएल स्पर्धेत एकूण ३०० सामने खेळले आहेत. ज्यात त्याने १७७ सामन्यांमध्ये विजय मिळवून दिला आहे. तर १२८ सामने गमावले आहेत. यादरम्यान दोन सामने बरोबरीत सुटले तर दोन सामने अनिर्णीत राहिले होते.

२) डॅरेन सॅमी (Dareen sammy) :

वेस्ट संघाचा माजी कर्णधार डॅरेन सॅमी याने १४ वर्ष वेस्ट इंडिज संघाचे तर आयपीएल स्पर्धेत डेक्कन चार्जर्स संघाचे प्रतिनिधित्व केले. त्याने आपल्या कारकीर्दीत एकूण २०८ सामन्यात संघाचे नेतृत्व केले. ज्यात त्याने १०४ सामन्यांमध्ये विजय मिळवून दिला. तर ९७ सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. यादरम्यान दोन सामने बरोबरीत सुटले. तर ५ सामने अनिर्णीत राहिले.

) विराट कोहली (Virat Kohli) :

भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) हा २०११ पासून आयपीएल स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचे तर तीनही स्वरूपात भारतीय संघाचे नेतृत्व केले आहे. त्याने १९० सामन्यांमध्ये नेतृत्व करताना ९४ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर ८५ सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे.

काय वाटतं? कोण असेल तो कर्णधार जो एमएस धोनीचा हा विक्रम मोडून काढेल? कमेंट करून नक्की सांगा...