कसोटी क्रिकेटमध्ये या देशातील फलंदाजांनी केल्या आहेत १० हजार धावा, यादीत भारतीय खेळाडू सर्वोच्च स्थानी...

कसोटी क्रिकेटमध्ये या देशातील फलंदाजांनी केल्या आहेत १० हजार धावा, यादीत भारतीय खेळाडू सर्वोच्च स्थानी...

कसोटी क्रिकेटमध्ये काही मोजकेच फलंदाज आहेत ज्यांना कसोटी क्रिकेटमध्ये १० हजार धावा (1000 runs in test cricket) करता आल्या आहेत. नुकताच इंग्लंडचा दिग्गज फलंदाज जो रूट याने कसोटी क्रिकेटमध्ये १० हजार धावा करण्याचा पराक्रम केला आहे. असा पराक्रम करणारा तो १४ वा फलंदाज ठरला आहे. तर इंग्लंड संघासाठी १० हजार धावा करणारा तो दुसरा फलंदाज ठरला आहे. जो रूटच्या आधी माजी इंग्लिश फलंदाज ॲलिस्टर कुकने हा पराक्रम केला आहे.

न्यूझीलंड विरुद्ध झालेल्या सामन्यात जो रूटने कसोटी क्रिकेटमध्ये १० हजार धावा करण्याचा कारनामा केला आहे. मात्र जो रूटच्या आधी १२ असे फलंदाज आहेत ज्यांनी कसोटी क्रिकेटमध्ये १० हजार धावा करण्याचा पराक्रम केला आहे. कोण आहेत ते फलंदाज? चला जाणून घेऊया.

भारतीय संघातील ३ फलंदाजांनी केल्या आहेत १० हजार धावा

भारतीय संघासाठी कसोटी क्रिकेटमध्ये १० हजार धावा करणारा सचिन तेंडुलकर हा पहिला भारतीय फलंदाज आहे. कसोटी क्रिकेटमध्ये सचिनच्या नावे १५,९२१ धावा आहेत. तर भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविडच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये १३,२८८ धावा आहेत. तसेच लिटिल मास्टर सुनील गावस्करांच्या नावे १०,१२२ धावा आहेत.

ऑस्ट्रेलिया संघातील ३ फलंदाजांनी केल्या आहेत १० हजार धावा.

ऑस्ट्रेलियासाठी १० हजार धावा करण्याचा पराक्रम दिग्गज फलंदाज रिकी पाँटिंगने केला होता. त्याच्या नावे कसोटी क्रिकेटमध्ये १३,३७८ धावा आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर ॲलन बॉर्डर (११,१७४) धावा) आणि तिसऱ्या क्रमांकावर स्टीव्ह वॉ (१०,९२७ धावा) आहेत.

दक्षिण आफ्रिका संघातील एका फलंदाजाने केल्या आहेत १० हजार धावा

दक्षिण आफ्रिका संघाचा दिग्गज फलंदाज जॅक कॅलिस याने आपल्या कसोटी कारकिर्दीत १० हजार धावांचा टप्पा पूर्ण केला आहे. असा पराक्रम करणारा तो दक्षिण आफ्रिकेचा एकमेव फलंदाज आहे.

पाकिस्तान संघातील एका खेळाडूने केल्या आहेत १० हजार धावा

पाकिस्तान संघाचा माजी कर्णधार युनूस खान याने कसोटी क्रिकेटमध्ये १० हजार धावा पूर्ण केल्या आहेत. असा करणारा तो एकमेव पाकिस्तानी फलंदाज आहे. त्याने १०,०९९ धावा केल्या होत्या.

श्रीलंकेच्या २ फलंदाजांनी केल्या आहेत १० हजार धावा

श्रीलंका संघाकडून केवळ दोन फलंदाज आहेत ज्यांना १० हजार धावा पूर्ण करता आल्या आहेत. कुमार संगकाराने कसोटी क्रिकेटमध्ये १२,४०० धावा केल्या आहेत तर महेला जयवर्धनेने ११,८१४ धावा केल्या आहेत.

वेस्ट इंडीजच्या २ फलंदाजांनी केल्या आहेत १० हजार धावा

कसोटी क्रिकेटचा दिग्गज फलंदाज ब्रायन लारा याने वेस्ट इंडिज संघासाठी १० हजार धावा केल्या आहेत. त्याने आपल्या कसोटी कारकिर्दीत ११,९५३ धावा केल्या आहेत. तर शिवनारायण चंद्रपॉलने कसोटी क्रिकेटमध्ये ११,८६७ धावा आहेत.

टॅग्स:

sachin tendulkarrahul dravidSunil Gavaskar

संबंधित लेख