नर्सच्या एका चुकीमुळे भारताने गमावला असता लिटिल मास्टर! वाचा सुनील गावस्कर यांचा रोमांचक किस्सा..

नर्सच्या एका चुकीमुळे भारताने गमावला असता लिटिल मास्टर! वाचा सुनील गावस्कर यांचा रोमांचक किस्सा..

प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या मागे एक खास किस्सा असतो, जो प्रत्येकाला जाणून घ्यायचा असतो. मात्र आज आम्ही ज्या क्रिकेटपटूचा किस्सा सांगणार आहोत, तो जरा हटके आहे. भारतीय संघाला उंचीवर पोहचवण्यात लिटिल मास्टर सुनील गावस्कर यांनी मोलाची भूमिका बजावली आहे. सुनील गावस्कर यांनी अप्रतिम फलंदाजी करत डॉन ब्रॅडमन सारख्या दिग्गजाचा देखील विक्रम मोडून काढला आहे. मात्र त्याच्या जन्माच्या वेळी असा काही रोमांचक किस्सा घडला होता, जो खूप कमी लोकांना माहीत असेल.

असे म्हणतात की, सुनील गावस्कर यांचा जेव्हा जन्म झाला त्यावेळी नर्स कडून एक मोठी चूक होणार होती. ती नर्स सुनील गावस्कर यांना मत्स्य पालन करणाऱ्याच्या मुलासोबत एक्सचेंज करणार होती. ही चूक त्या नर्स कडून नकळत होणार होती. जर असे झाले असते तर भारतीय संघाला दिग्गज फलंदाज कधीच मिळाला नसता. 

आजच्याच दिवशी तोडला होता डॉन ब्रॅडमन यांचा विक्रम..

आजच्याच दिवशी ३९ वर्षांपूर्वी चेन्नईच्या मैदानावर सुनील गावस्कर यांनी डॉन ब्रॅडमन यांचा १९४८ मध्ये केलेला विक्रम मोडून काढला होता. त्यावेळी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके झळकावण्याचा विक्रम हा डॉन ब्रॅडमन यांच्या नावे होता. डॉन ब्रॅडमन यांच्या नावे २९ शतकांची नोंद होती. तर सुनील गावस्कर यांनी २८ डिसेंबर १९८३ रोजी ३० वे शतक झळकावत डॉन ब्रॅडमन यांचा विक्रम मोडून काढला होता.

वेस्ट इंडिज विरुध्द झळकावले होते ३० वे शतक...

सुनील गावस्कर यांनी ही ऐतिहासिक खेळी वेस्ट इंडिज संघाविरुद्ध खेळताना केली होती. २४ ते २८ डिसेंबर दरम्यान खेळल्या गेलेल्या या सामन्यात सुनील गावस्कर यांनी तुफानी खेळी करत दुहेरी शतक झळकावले होते. त्यांनी ६४४ मिनिटे फलंदाजी करत ४२५ चेंडूंचा सामना करत २३६ धावांची खेळी केली होती. या खेळी दरम्यान त्यांनी २४ चौकार मारले होते. मात्र हा सामना अनिर्णीत ठरला होता. सध्या सर्वाधिक शतके झळकावण्याचा विक्रम हा दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकरच्या नावे आहे.

टॅग्स:

Sunil Gavaskar

संबंधित लेख