मेलबर्नमध्ये डेव्हिड वॉर्नरला देण्यात आलेले Johnny Mullagh Medal काय आहे? वाचा या मेडलचा इतिहास...

मेलबर्नमध्ये डेव्हिड वॉर्नरला देण्यात आलेले Johnny Mullagh Medal काय आहे? वाचा या मेडलचा इतिहास...

मेलबर्नच्या मैदानावर ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये बॉक्सिंग डे कसोटी सामना पार पडला. सामन्याच्या चौथ्या दिवशीच या सामन्याचा निकाल लागला. ऑस्ट्रेलिया संघाने जोरदार कामगिरी करत १ डाव आणि १८२ धावांनी दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला. ऑस्ट्रेलिया संघाला विजय मिळवून देण्यात डेव्हिड वॉर्नरने (David Warner) मोलाची भूमिका बजावली. या कामगिरीनंतर त्याला जॉनी मुल्लाग मेडल देऊन गौरविण्यात आले. आता प्रश्न असा पडतो की,जॉनी मुल्लाग मेडल का आणि कोणाला दिले जाते? याबाबत अधिक माहिती आपण बोभाटाच्या या लेखातून जाणून घेणार आहोत.

जेव्हा एखादा क्रिकेटपटू सामन्यात चांगली कामगिरी करतो त्यावेळी त्याला सामनावीर पुरस्कार दिला जातो. यादरम्यान त्याला ट्रॉफी किंवा बक्षीस रक्कम दिली जाते. मात्र बॉक्सिंग डे कसोटीत चांगली कामगिरी करणाऱ्या डेव्हिड वॉर्नरला मेडल देण्यात आले. यावरून तुम्हाला अंदाज आला असेल की, बॉक्सिंग डे कसोटीत चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूला मेडल देऊन गौरविण्यात येते.

जॉनी मुल्लाग मेडल देण्याची सुरुवात कधीपासून झाली?

आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल की, जॉनी मुल्लाग मेडल देण्याची सुरुवात कधी पासून झाली? तर फार मागे जाण्याची गरज नाहीये. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात २०२१ मध्ये झालेल्या बॉक्सिंग डे कसोटी सामण्यापासून हे मेडल देण्याची प्रथा सुरू झाली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या कसोटी सामन्यात स्कॉट बोलंडने हे मेडल पटकावण्याचा मान मिळवला होता. यावेळी डेव्हिड वॉर्नरला हा मान मिळाला आहे.

कोण होते जॉनी मुल्लाग?

ऑस्ट्रेलियन क्रिकेटला उंचीवर नेण्यात जॉनी मुल्लाग यांनी मोलाची भूमिका बजावली आहे. १८६८ साली त्यांनी ऑस्ट्रेलिया संघाचे नेतृत्व केले होते. १८६८ मध्ये ब्रिटन दौऱ्यावर त्यांनी ४७ सामन्यांपैकी ४५ सामने खेळले होते. यादरम्यान त्यांनी २३ च्या सरासरीने १६९८ धावा केल्या होत्या. तर गोलंदाजी करताना २४५ गडी बाद केले होते. ते ऑस्ट्रेलियाचे उत्तम अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखले जातात.