आयपीएल २०२२ (Ipl 2022) स्पर्धेतील ४४ सामना राजस्थान रॉयल्स (Rajasthan royals) आणि मुंबई इंडियन्स (Mumbai indians) या दोन्ही संघांमध्ये पार पडणार आहे. हा सामना नवी मुंबईतील डी वाय पाटील स्टेडियमवर रंगणार आहे. आयपीएल २०२२ स्पर्धेत २ एप्रिल रोजी हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाने २३ धावांनी विजय मिळवला होता.
तसेच आयपीएल २०२२ स्पर्धेतील कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर, राजस्थान रॉयल्स संघाने ८ पैकी ६ सामन्यात विजय मिळवला आहे. राजस्थान रॉयल्स संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी आहे. तर मुंबई इंडियन्स संघाला ८ पैकी ८ सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. कर्णधार एमएस धोनीच्या वाढदिवशी मुंबई इंडियन्स संघ विजय मिळवण्याच्या प्रयत्नात असणार आहे.
या सामन्यासाठी अशी असू शकते दोन्ही संघांची संभावित प्लेइंग ११
राजस्थान रॉयल्स :
संजू सॅमसन (कर्णधार), जोस बटलर, देवदत्त पडिक्कल, शिमरॉन हेटमायर, रियान पराग, ट्रेंट बोल्ट, जेम्स नीशम, युजवेंद्र चहल, रविचंद्रन अश्विन, प्रसिद्ध कृष्णा, कुलदीप सेन
मुंबई इंडियन्स :
रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन, टिळक वर्मा, सूर्यकुमार यादव, कायरन पोलार्ड, डेवाल्ड ब्रेविस, डॅनियल सॅम्स, रिले मेरेडिथ, ऋतिक शौकीन, जसप्रीत बुमराह, जयदेव उनाडकट
अशी आहे बोभाटाची ड्रीम ११ :
संजू सॅमसन, जोस बटलर, देवदत्त पडिक्कल, रोहित शर्मा, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, रविचंद्रन अश्विन, युजवेंद्र चहल, प्रसिद्ध कृष्णा, जसप्रीत बुमराह आणि जयदेव उनाडकट
कर्णधार - जोस बटलर
उपकर्णधार - सूर्यकुमार यादव
