Matthew Hayden Birthday: मुंगूस बॅटने गोलंदाजांचा कर्दनकाळ ठरणाऱ्या हेडनला क्रिकेट विश्व का घाबरायचं??

Matthew Hayden Birthday: मुंगूस बॅटने गोलंदाजांचा कर्दनकाळ ठरणाऱ्या हेडनला क्रिकेट विश्व का घाबरायचं??

आयसीसी टी -२० विश्वचषक २०२२ स्पर्धेत झिम्बाब्वे संघाने पाकिस्तान संघाला न पचणारे दुःख दिले आहे. या धक्क्यातून पाकिस्तान संघ लवकर बाहेर येऊ शकणार नाहीये. पाकिस्तान संघ झिम्बाब्वे संघाकडून पहिल्यांदा पराभूत झाला आहे. मात्र पाकिस्तान संघाचा मुख्य प्रशिक्षक मॅथ्यू हेडनच्या आयुष्यात दुसऱ्यांदा हा प्रसंग आला आहे. ऑस्ट्रेलिया संघासाठी खेळत असताना, मुंगूस बॅटने गोलंदाजांचा कर्दनकाळ ठरणाऱ्या मॅथ्यू हेडनने लांबच लांब षटकार मारले होते. आज तो आपला ५० वा वाढदिवस साजरा करतोय.

ऑस्ट्रेलिया संघ हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात मजबूत संघांपैकी एक आहे. मात्र २००७ टी -२० विश्वचषक स्पर्धेत झिम्बाब्वे संघाने ऑस्ट्रेलिया संघाला देखील जोरदार धक्का दिला होता. ऍडम गिलख्रिस्ट, मायकल क्लार्क, ब्रेट ली आणि स्वतः मॅथ्यू हेडन असलेल्या संघाला झिम्बाब्वे संघाने पराभूत करत सर्वांनाच आश्चर्यचकित केले होते. त्यावेळी तो एक खेळाडू होता. मात्र आता १५ वर्षांनंतर त्याला मुख्य प्रशिक्षक म्हणून या दुःखाचा सामना करावा लागत आहे.

मॅथ्यू हेडनचा जन्म २९ ऑक्टोबर, १९७१ रोजी ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँड येथे झाला होता. तो ऑस्ट्रेलियाच्या सर्वोत्तम सलामीवीर फलंदाजांपैकी एक आहे. २००७ पासून ते २०११ पर्यंत तो जोरदार फॉर्ममध्ये होत. या काळात त्याने गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली होती. त्याने २००३ आणि २००७ विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलिया संघाला जेतेपद मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली होती.

गतवर्षी त्याची पाकिस्तान क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी वर्णी लागली होती. मात्र जेव्हा तो फलंदाजीला यायचा तेव्हा सर्वांचं लक्ष त्याच्या मुंगूस बॅट कडे असायचं. बॅटचा दांडा मोठा मात्र बॅट लहान. तरीदेखील चेंडू बॅटला लागताच थेट स्टेडियमच्या बाहेर जायचा. मॅथ्यू हेडनमुळे मुंगूस बॅटचा क्रेझ खूप वाढला होता. ती बॅट बेस बॉल बॅट सारखी वाटायची. तशी वजनाने इतर बॅट पेक्षा हलकी असायची मात्र बेस मजबूत असायचा.