आंतररष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकीकडे भारत, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया सारखे श्रीमंत बोर्ड आहेत. तर दुसरीकडे एक बोर्ड असा देखील आहे, जिथे खेळाडूंना मानधन देण्याइतके पैसे देखील नसतात. आम्ही कुठल्या बोर्ड बद्दल बोलतोय, याची कल्पना तुम्हाला नक्कीच आली असेल. आम्ही बोलतोय झिम्बाब्वे संघाबद्दल. होय, तोच संघ ज्याने आयसीसी टी -२० विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तान संघाला पराभूत केलं. अटीतटीच्या सामन्यात शेवटच्या चेंडूवर झिम्बाब्वे संघाने पाकिस्तान संघाला १ धावेने पराभूत करता इतिहास रचला. या ऐतिहासिक विजयानंतर झिम्बाब्वेचे खेळाडू मैदानावर जल्लोष साजरा करताना दिसून आले होते.
या विजयानंतर केवळ पर्थच्या मैदानावर नव्हे तर, संपूर्ण झिम्बाब्वेमध्ये जल्लोषाचे वातावरण होते. मात्र आज आम्ही तुम्हाला झिम्बाब्वे संघातील खेळाडूंची अशी बाजू सांगणार आहोत जी खूप कमी लोकांना माहीत आहे.
एका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, झिम्बाब्वे क्रिकेट बोर्डने आपल्या खेळाडूंची विभागणी ४ गटांमध्ये केली आहे. पहिल्या गटातील खेळाडूंना ५ हजार अमेरिकन डॉलर्स (३.२० लाख रुपये) तर ग्रेड ए च्या खेळाडूंना ३५०० अमेरिकन डॉलर्स (२.८० लाख रुपये ). तसेच ग्रेड बी च्या खेळाडूंना प्रती महिना दीड लाख रुपये आणि ग्रेड सी च्या खेळाडूंना प्रती महिना १ लाख रुपये दिले जातात.
झिम्बाब्वे क्रिकेट बोर्डला गेल्या काही वर्षांपासून आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. झिम्बाब्वे क्रिकेट बोर्डला आयसीसी कडून आर्थिक मदत केली जाते. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की, झिम्बाब्वे नॅशनल प्रीमियर लीग स्पर्धा जिंकणाऱ्या संघाला,आयपीएल स्पर्धेतील एका खेळाडूच्या बेस प्राईज पेक्षाही कमी रक्कम बक्षिस म्हणून दिली जाते.
ही स्पर्धा जिंकणाऱ्या संघाला केवळ ८.५० लाख रुपये बक्षिस म्हणून दिले जातात. तर आयपीएल स्पर्धेत खेळाडूची बेस प्राईज ही २० लाख रुपये असते. हेच कारण आहे की, झिम्बाब्वे संघातील खेळाडूंकडे महागड्या गाड्या आणि आलिशान बंगले नाहीये. मात्र हे खेळाडू आपल्या कामगिरीने आता लाखो क्रिकेट चाहत्यांच्या मनात घर करत आहेत.
