तब्बल ६० वर्षानंतर क्रिकेटर नरी कॉन्ट्रॅक्टर यांच्या डोक्यातून काढली गेली मेटल प्लेट, विंडीज गोलंदाजाने फोडलं होतं डोकं

तब्बल ६० वर्षानंतर क्रिकेटर नरी कॉन्ट्रॅक्टर यांच्या डोक्यातून काढली गेली मेटल प्लेट, विंडीज गोलंदाजाने फोडलं होतं डोकं

भारतीय क्रिकेट संघ ६० वर्षांपूर्वी वेस्ट इंडिज दौऱ्यावर गेला होता. या दौऱ्यावर भारत आणि वेस्ट इंडिज या दोन्ही संघांमध्ये १६ फेब्रुवारी १९६२ पासून ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेला प्रारंभ झाला होता. या मालिकेतील दोन कसोटी सामने झाल्यानंतर बार्बाडोसच्या मैदानावर एक सराव सामना खेळला गेला होता. या सामन्यात असे काही घडले होते, ज्यामुळे संपूर्ण क्रिकेट विश्व हादरून गेले होते. भारतीय क्रिकेटपटू नरी कॉन्ट्रॅक्टर यांच्या डोक्याला चेंडू लागला होता.

हाच सामना त्यांच्या क्रिकेट कारकीर्दीतील शेवटचा सामना ठरला होता.

सध्या क्रिकेटमध्ये वेगवान गोलंदाजांविरुद्ध खेळताना फलंदाज हेल्मेट, पॅड, थायपॅड घालून खेळत असतात. सुरक्षेच्या बाबतीत ते कुठेही कमी पडत नसतात. परंतु सुरुवातीच्या काळात जेव्हा हेल्मेट हा प्रकारच कोणाला माहित नव्हता, त्यावेळी फलंदाज निडर होऊन गोलंदाजांचा सामना करायचे. त्यामुळे फलंदाजाला दुखापत होण्याची शक्यता अधिक असायची. असाच  प्रकार १९६२ मध्ये नारी कॉन्ट्रॅक्टर यांच्यासोबत घडला होता. वेस्ट इंडिज संघाचा वेगवान गोलंदाज चार्ली ग्रिफिथ याने टाकलेला चेंडू नारी कॉन्ट्रॅक्टर यांच्या डोक्याला जाऊन लागला होता. त्या चेंडूची गती इतकी होती की, चेंडू लागताच त्यांचं डोकं फाटलं होत.

चार्ली ग्रिफिथचा चेंडू डोक्याला लागल्यानंतर नारी कॉन्ट्रॅक्टर ६ दिवस बेशुध्द होते. त्यांना वाचवण्यासाठी तब्बल ५ लोकांनी रक्त दिले होते. ज्यामध्ये वेस्ट इंडिजचे फ्रँक वॉरेल, बापू नाडकर्णी, चंदू बोर्डे, पॉली उमरीगर आणि पत्रकार केएन प्रभू यांचा समावेश होता. त्यादरम्यान कसातरी त्यांचा जीव वाचला, परंतु त्यानंतर देखील अनेक शस्त्रक्रिया झाल्या. तामिळनाडूतील रुग्णालयात त्यांच्या डोक्यावर धातूची प्लेट लावण्यात आली होती.गेल्या काही दिवसांपासून त्यांचं डोकं खूप दुखत होतं. ज्यामुळे डॉक्टरांनी त्यांना धातूची प्लेट काढून टाकण्याचा सल्ला दिला होता. ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडल्यानंतर, नरी कॉन्ट्रॅक्टर यांच्या मुलाने त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती दिली आहे. त्यांनी म्हटले की, "नरी कॉन्ट्रॅक्टर आता पूर्णपणे ठीक आहेत. लवकरच त्यांना घरी जाण्याची परवानगी दिली जाईल."आता तब्बल ६० वर्षानंतर ती धातूची प्लेट यशस्वीरीत्या काढण्यात आली आहे

होशेदार यांनी म्हटले की, "वडिलांच्या डोक्यावरील शस्त्रक्रिया यशस्वीपणे झाली आहे. काही दिवसांत त्यांना रुग्णालयातून घरी जाण्याची परवानगी मिळेल. धातूच्या प्लेटमुळे डोक्यावरील त्या भागाची त्वचा निघू लागली होती. हे पाहून डॉक्टरांनी मेटल प्लेट काढण्याचा सल्ला दिला. यामुळे आम्हाला काळजी वाटली, परंतु आता सर्व काही ठीक आहे."