आयपीएलमध्ये सध्या अनेक नवोदित खेळाडू धुमाकूळ घालत आहेत. या खेळाडूंपैकी अनेक जण पुढे जाऊन भारतीय संघाचे नेतृत्व करतील. पंजाब क्रिकेट म्हटले म्हणजे सर्वात पुढे हरभजन सिंगचा चेहरा समोर येतो, पण आता पंजाबच्या एका नवोदित खेळाडूने रात्रीत हवा केली आहे.
हरप्रितसिंग ब्रार असे त्याचे नाव आहे. हरभजन प्रमाणेच तो बॉलर असला तरी बॅटिंगच्या जोरावर ऐनवेळी सामना उलटावण्याची ताकद त्याच्यात आहे. पंजाब किंग्जकडून खेळत असलेल्या हरप्रितने गेल्या सामन्यात RCB विरुद्ध खेळताना विराट कोहली, एबी डिव्हीलीयर्स आणि ग्लेन मॅक्सवेल अशा तिन्ही महारथींना पॅवेलीयनमध्ये पाठवत सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. बॅटिंग करताना देखील त्याने १७ बॉल्सवर २४ धावा करत आपण दोन्ही गोष्टी करू शकतो हे दाखवून दिले.





