आयपीएल २०२२(Ipl 2022) स्पर्धेतील १८ वा सामना मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघांमध्ये रंगणार आहे. हा सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर सुरू आहे. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर मुंबई इंडियन्स संघ मोठी धावसंख्या उभारण्याच्या दृष्टीने मैदानात उतरणार आहे.
या दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत २९ सामने झाले आहेत. ज्यामध्ये मुंबई इंडियन्स संघाने बाजी मारत १७ सामन्यात विजय मिळवला आहे. तर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला १२ सामन्यात विजय मिळवण्यात यश आले आहे. तसेच या हंगामात मुंबई इंडियन्स संघाला आतापर्यंत एकही विजय मिळवता आला नाहीये. या संघाने सलग ३ सामने गमावले आहेत. तसेच रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने ३ पैकी २ सामने जिंकले आहेत.
या सामन्यासाठी अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११
मुंबई इंडियन्स :
रोहित शर्मा( कर्णधार), ईशान किशन, डेवाल्ड ब्रेविस, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, कायरन पोलार्ड, रमनदीप सिंग, मुर्गन अश्विन, जयदेव उनाडकट, जसप्रीत बुमराह, बासिल थंपी
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर :
फाफ डू प्लेसिस ( कर्णधार), अनुज रावत, विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, दिनेश कार्तिक, शाहबाज अहमद, वानिंदू हसरंगा, हर्षल पटेल, डेविड विली, मोहम्मद सिराज, अर्ष दीप




