आयपीएल २०२२ स्पर्धेतील पहिल्या आठवड्यात आतापर्यंत अनेक रोमांचक सामने पाहायला मिळाले आहेत. या स्पर्धेतील ६ वा सामना फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्स यांच्या दरम्यान पार पडणार आहे. हा सामना नवी मुंबई येथे असलेल्या डी वाय पाटील स्टेडियम येथे पार पडणार आहे. हे दोन्ही संघ आतापर्यंत आयपीएल स्पर्धेत २९ वेळेस आमने सामने आले आहेत. ज्यामध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघाने १६ तर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने १३ वेळेस विजय मिळवला आहे.
या हंगामातील पहिल्याच सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाने चेन्नई सुपर किंग्ज संघाला पराभूत करत विजयी सुरुवात केली होती. तर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला पंजाब किंग्ज संघाकडून पराभवाचा सामना करावा लागला होता.
अशी असू शकते दोन्ही संघांची प्लेइंग ११
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर :
फाफ डू प्लेसिस (कर्णधार), दिनेश कार्तिक, अनुज रावत, विराट कोहली, शर्फीन रूदरफोर्ड, वनिंदू हसरंगा, डेविड विली, हर्षल पटेल, शाहबाज अहमद, सिद्धार्थ कौल, मोहम्मद सिराज
कोलकाता नाईट रायडर्स :
श्रेयस अय्यर (कर्णधार), शेल्डन जॅक्सन, सॅम बिलिंग्ज, अजिंक्य रहाणे, नितीश राणा, व्यंकटेश अय्यर, आंद्रे रसेल, सुनील नरेन, वरुण चक्रवर्ती, शिवम मावी, उमेश यादव
अशी असू शकते ड्रीम ११ टीम :
अनुज रावत, फाफ डू प्लेसिस, विराट कोहली, श्रेयस अय्यर, व्यंकटेश अय्यर, आंद्रे रसेल, वनिंदू हसरंगा, हर्षल पटेल, सिद्धार्थ कौल, उमेश यादव
कर्णधार : फाफ डू प्लेसिस
उपकर्णधार : श्रेयस अय्यर




