भारतीय संघाची कामगिरी सध्या चांगलीच सुमार सुरू आहे. T20 वर्ल्डकपमधील पहिले दोन्ही सामने दारुण हरावे लागले आहेत. अशा परिस्थितीत रवी शास्त्रींची गच्छंती होऊन नवा दमाचा प्रशिक्षण येणे गरजेचे आहे असे म्हटले जात होते.
रवी शास्त्रीचा कार्यकाळ या वर्ल्डकपनंतर संपणार आहे. आता अधिकृतपणे राहुल द्रविड भारताचा प्रशिक्षक असेल अशी घोषणा बीसीसीआयकडून करण्यात आली आहे. द्रविडच्या नावाची घोषणा झाल्यावर क्रिकेट चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
द्रविड येत्या १७ नोव्हेंबरपासून न्यूझीलँडबरोबर सुरू होणाऱ्या २ कसोटी आणि ३ T20 सामन्यांपासून तो ही धुरा सांभाळणार आहे. द्रविडबद्दल वेगळे सांगण्याची गरज नाही. २०१८ साली त्याच्याच प्रशिक्षणाखाली अंडर १९ संघाने वर्ल्डकप जिंकला होता. तर २०१६ साली संघ फायनलमध्ये गेला होता.








