७ फेब्रुवारी, १९९९ साली पाकिस्तान विरुद्धच्या टेस्ट सामन्यात अनिल कुंबळेने एका इनिंगमध्ये १० पैकी १० विकेट्स घेऊन इतिहास रचला होता. अशी कामगिरी करणारा तो इतिहासातील दुसरा खेळाडू ठरला. आज २० वर्षानंतर आणखी एका तुफान गोलंदाजाने अनिल कुंबळेच्या पावलांवर पाऊल ठेवलंय.

मणिपूरच्या राजकुमार रेक्स सिंग या पठ्ठ्याने अरुणाचल प्रदेश विरुद्धच्या टेस्ट सामन्यात एका इनिंगमध्ये १० विकेट्स घेऊन भल्याभल्यांना धक्का दिलाय राव. १० विकेट्स मधल्या ५ जणांच्या त्याने दांडी गुल केल्या तर २ जणांना LBW ने मात दिली, उरलेल्या ३ जणांना कॅचने आउट व्हावं लागलं. त्याच्याच जोरावर मणिपूरने सामना १० विकेट्सने जिंकला आहे.

मंडळी, हा सामना “अंडर १९ कूच बिहार ट्रॉफी” या स्पर्धेसाठी खेळला जात होता. ही स्पर्धा १९४५ पासून भरवली जात आहे. या स्पर्धेने भारताला अनेक नावाजलेले खेळाडू दिले आहेत. सचिनने १९८८-८९ साली याच स्पर्धांमध्ये मुंबईच्या बाजूने खेळून तब्बल २१४ धावा केल्या होत्या.
राजकुमारच्या गोलंदाजीने धडाकेबाज खेळाडूंची ही परंपरा पुढे अशीच चालू राहील असा विश्वास वाटत आहे. चला तर त्याची ही तुफान गोलंदाजी या व्हिडीओ मध्ये पाहूया !!
What a spell, 10 out of 10. Rex Singh from Manipur on pic.twitter.com/IPIkJKxQFH
— Paresh (@hi_paresh) December 14, 2018




