विकेटकिपिंग नंतर आता फलंदाजीमध्ये पंतची एमएस धोनीला टक्कर! या मोठ्या विक्रमात टाकले मागे

विकेटकिपिंग नंतर आता फलंदाजीमध्ये पंतची एमएस धोनीला टक्कर! या मोठ्या विक्रमात टाकले मागे

भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये कसोटी मालिकेतील दुसरा कसोटी सामना सुरू आहे. या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय यष्टिरक्षक फलंदाज रिषभ पंतने अनेक विक्रम मोडून काढले आहेत. त्याने एमएस धोनीचा कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान अर्धशतक झळकावण्याचा विक्रम मोडून काढला आहे. याष्टिरक्षक फलंदाज म्हणून कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद अर्धशतक झळकावण्याचा विक्रम एमएस धोनीच्या नावावर होता. त्याने २००६ मध्ये पाकिस्तान विरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने अवघ्या ३४ चेंडूंमध्ये अर्धशतकी खेळी केली होती. श्रीलंका विरुद्ध झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात रिषभ पंतने अवघ्या २८ चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावले आहे.

यासह तो कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद अर्धशतक झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो अव्वल स्थानी पोहोचला आहे. या बाबतीत त्याने माजी भारतीय यष्टिरक्षक फलंदाज एमएस धोनी आणि ऑस्ट्रेलियाचा यष्टिरक्षक फलंदाज इयान स्मिथला मागे टाकले आहे.

तसेच रिषभ पंतने कपिल देव यांचा ४० वर्षांपूर्वीचा देखील विक्रम मोडून काढला आहे. कपिल देव यांनी १९८२ मध्ये पाकिस्तान विरुद्ध झालेल्या कसोटी सामन्यात कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद ३० चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावले होते. आता रिषभ पंतने अवघ्या २८ चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावले आहे. तसेच भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू शार्दुल ठाकूर या यादीत तिसऱ्या स्थानी आहे. शार्दुल ठाकूरने ३१ चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावले होते.