सचिन, धोनी नंतर आणखी एका क्रिकेटपटूच्या आयुष्यावर येणार बायोपिक, 'हा' प्रसिध्द अभिनेता साकारणार मुख्य भूमिका

सचिन, धोनी नंतर आणखी एका क्रिकेटपटूच्या आयुष्यावर येणार बायोपिक, 'हा' प्रसिध्द अभिनेता साकारणार मुख्य भूमिका

गेल्या काही वर्षात अनेक दिग्गज क्रिकेटपटूंच्या आयुष्यावर आधारित चित्रपट निर्मित करण्यात आले आहे. ज्यामध्ये कपिल देव, मोहम्मद अजहरुद्दीन (Mohammad azharuddin), सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आणि एमएस धोनी (Ms dhoni) यांसारख्या दिग्गज खेळाडूंचा समावेश आहे. आता आणखी एका क्रिकेटपटूच्या आयुष्यावर आधारित बायोपिक चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. 

ज्या वयात क्रिकेटपटू आपल्या क्रिकेट कारकिर्दीला राम राम करत निवृत्ती जाहीर करत असतात, त्याच वयात आयपीएल स्पर्धेत पदार्पण करणारा क्रिकेटपटू म्हणजे प्रवीण विजय तांबे (Pravin tambe) . ३० किंवा ३५ वय झाल्यानंतर शरीर साथ देत नसल्यामुळे अनेक खेळाडूंनी निवृत्ती जाहीर केली आहे. परंतु या पठ्ठ्याने चक्क वयाच्या ४१ व्या वर्षी आयपीएल स्पर्धेत पदार्पण केले होते. याच स्पर्धेत त्याने आपल्या फिरकी गोलंदाजीच्या जोरावर दिग्गज फलंदाजांना अडचणीत देखील टाकले होते. चला तर जाणून घेऊया त्याच्या येणाऱ्या बयोपिक बद्दल अधिक माहिती.

प्रवीण विजय तांबेच्या आयुष्यातील संघर्ष सांगणारी कथा आता प्रेक्षकांना रुपेरी पडद्यावर पाहता येणार आहे. त्याच्या बायोपिकचे नाव 'कोण प्रवीण तांबे' (Kaun Pravin tambe) असे ठेवण्यात आले आहे. जयप्रसाद देसाई (jayprasad desai) निर्मित या बायोपिकमध्ये प्रसिद्ध बॉलिवुड अभिनेता श्रेयस तळपदे ( shreyas Talpade) मुख्य भूमिका साकारताना दिसून येणार आहे. हा बायोपिक ओटीटी प्लॅटफॉर्म डिस्नी प्लस हॉटस्टारवर रिलीज करण्यात येणार आहे. तसेच हा बायोपिक १ एप्रिल २०२२ रोजी ३ भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात येणार आहे. ज्यामध्ये हिंदी, तमिळ आणि तेलुगू या भाषेचा समावेश असणार आहे.

कोण आहे प्रवीण तांबे? 

प्रवीण विजय तांबेचा जन्म ८ ऑक्टोबर १९७१ रोजी मुंबईमध्ये झाला आहे. वयाच्या ४९ व्या वर्षी देखील त्याच्या गोलंदाजीची धार कायम आहे. या वयात देखील तो फलंदाजांना अडचणीत टाकत असतो. त्याने २०१३ मध्ये आयपीएल स्पर्धेत पदार्पण केले होते. त्याने या स्पर्धेत गुजरात लायन्स, राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद संघाचे प्रतिनिधित्व केले आहे.

आयपीएल २०१३ स्पर्धेत त्याला राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळण्याची संधी देण्यात आली होती. त्यावेळी त्याने प्रथम श्रेणीचा एकही सामना खेळला नव्हता. त्यानंतर त्याला २ प्रथम श्रेणी आणि ६ लिस्ट ए सामने खेळण्याची संधी मिळाली. ज्यामध्ये त्याने एकूण ७ गडी बाद केले. त्यामुळे त्याची आगामी बायोपिक अनेकांना प्रेरणा देणारी ठरू शकते.