बापरे, हिच्यासमोर ज्वालामुखीही थंडावला?

बापरे, हिच्यासमोर ज्वालामुखीही थंडावला?

ज्वालामुखी उसळतोय आणि त्याचा उसळता लालेलाल लाव्हारस पाण्यात पडतोय, ज्वालामुखीमुळे पाण्यात दगडही कोसळण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत तुम्ही काय कराल? 

मदतीसाठी हाक माराल किंवा तिथून शक्य तितक्या लवकर पळून जाल, नाही का?   पण ही  ऍलीसन टिल ही एक भयंकर धाडसी बाई आहे. तिला हवाई बेटांवरच्या Kilauea या ज्वालामुखीच्या लाव्हारसाच्या प्रवाहाजवळ सर्फिंग करायचं होतं आणि तिने हा निश्चय या महिन्याच्या १२ ऑगस्टला तडीस नेला. या व्हिडिओमध्ये लाव्हारस पाण्यात कोसळताना दिसतोय पण तिच्या चेहर्‍यावर भीतीचा लवलेशही नाहीय. ऍलीसन बिन्धास्त  आणि हसतमुखाने या ज्वालामुखीच्या पायथ्याशी सर्फिंग करताना दिसतेय. एकदा तर ती लाव्हारसामुळे समुद्रात कोसळणार्‍या खडकापासून अगदी थोडक्यात वाचल्याचंही बातम्यांत वाचायला मिळत आहे. 

नंतरच्या मुलाखतीत तिने हा अनुभव "श्वास रोखायला लावणारा, विनम्र बनवणारा आणि तितकाच हॉट’ होता असं म्हटलंय. आहे बुवा ही बाई खरी धाडसी. तिच्या या धाडसाला आणि तिलाही टीम बोभटा.कॉमचा सलाम!!