३ दुर्दैवी खेळाडू ज्यांना आशिया कपसाठी भारतीय संघात संधी मिळायला हवी होती..

३ दुर्दैवी खेळाडू ज्यांना आशिया कपसाठी भारतीय संघात संधी मिळायला हवी होती..

आशिया चषक २०२२ (Asia Cup 2022) स्पर्धेला येत्या २७ ऑगस्ट पासून सुरुवात होणार आहे. भारतीय संघाचा पहिला सामना कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाकिस्तान संघाविरुद्ध पार पडणार आहे. या सामन्यापूर्वी भारतीय संघ जोरदार तयारी करताना दिसून येत आहे. या स्पर्धेसाठी बीसीसीआयने (BCCI) जाहीर केलेल्या संघात,त्या सर्व खेळाडूंना संधी दिली गेली आहे, ज्यांना प्रबळ दावेदार मानले जात होते. मात्र काही असे देखील खेळाडू आहेत, ज्यांना या संघात संधी मिळायला हवी होती. कोण आहेत ते खेळाडू? चला पाहूया.

१) श्रेयस अय्यर (Shreyas iyer):

श्रेयस अय्यर हा भारतीय संघातील प्रमुख खेळाडूंपैकी एक आहे. अनेकदा त्याने महत्वपूर्ण खेळी करत भारतीय संघाला विजय मिळवून दिला आहे. मात्र सध्या फॉर्ममध्ये नसल्यामुळे त्याला आशिया चषक २०२२ स्पर्धेसाठी भारतीय संघात स्थान दिले गेले नाहीये. आगामी आशिया चषक २०२२ स्पर्धा टी -२० स्वरूपात खेळवली जाणार आहे. त्यामुळे त्याला जर या स्पर्धेत खेळण्याची संधी मिळाली असती तर त्याने चांगली कामगिरी करत जोरदार पुनरागमन केले असते. कारण आशिया चषक स्पर्धेत चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना आगामी टी -२० विश्वचषक स्पर्धेसाठी संघात स्थान दिले जाऊ शकते. मात्र श्रेयस अय्यरला राखीव खेळाडू म्हणून संधी देण्यात आली आहे. जर एखादा खेळाडू स्पर्धेतून बाहेर झाला तर त्याच्या ऐवजी श्रेयस अय्यरला स्थान दिले जाऊ शकते. 

२) अक्षर पटेल (Axar Patel):

भारतीय संघातील डाव्या हाताचा अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. टी -२० क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या अक्षर पटेलला रवींद्र जडेजाचा बॅकअप खेळाडू म्हणून संधी दिली जाते. मात्र रवींद्र जडेजा सध्या जोरदार कामगिरी करतोय. तसेच अक्षर पटेल देखील चांगली कामगिरी करत आहे. मात्र जडेजामुळे त्याला संघात स्थान दिले गेले नाहीये. अक्षर पटेलला देखील राखीव खेळाडू म्हणून स्थान देण्यात आले आहे.

३) ईशान किशन (Ishan kishan) :

ईशान किशन हा भारतीय संघातील तिसरा असा खेळाडू आहे ज्याला भारतीय संघात स्थान दिले गेले नाहीये. सध्या तो भारतीय संघातील आक्रमक फलंदाजांपैकी एक आहे. अनेकदा त्याने भारतीय संघाला चांगली सुरुवात करून दिली आहे. मध्यक्रमात देखील त्याने तुफान फटकेबाजी केल्याचे पाहायला मिळाले आहे. मात्र त्याला आगामी आशिया चषक स्पर्धेसाठी संघात स्थान दिले गेले नाहीये.

काय वाटतं या ३ खेळाडूंपैकी कुठल्या खेळाडूला प्रमुख संघात संधी मिळायला हवी होती. कमेंट करून नक्की कळवा.