येत्या काही दिवसात आशिया चषक २०२२ स्पर्धेला (Asia Cup 2022) प्रारंभ होणार आहे. या स्पर्धेत फलंदाजांनी धावांचा पाऊस पाडला आहे. तर गोलंदाजांचा देखील बोलबाला पाहायला मिळाला आहे. तुम्हाला माहित आहे का? आशिया चषक स्पर्धेत सर्वाधिक गडी बाद करण्याचा विक्रम कुठल्या गोलंदाजाच्या नावे आहे? नाही ना? आज आम्ही तुम्हाला या लेखातून आशिया चषक स्पर्धेत सर्वाधिक गडी बाद करणाऱ्या टॉप -५ गोलंदाजांबद्दल माहिती देणार आहोत.( top 5 highest wicket takers in Asia cup)
लसिथ मलिंगा (Lasith malinga) :
आशिया चषक स्पर्धेत सर्वाधिक गडी बाद करण्याचा विक्रम हा श्रीलंकेचा माजी गोलंदाज लसिथ मलिंगाच्या नावे आहे. मलिंगा हा टी -२० क्रिकेटमधील दिग्गज गोलंदाजांपैकी एक आहे. त्याने आशिया चषक स्पर्धेतील १५ सामन्यांमध्ये एकूण ३३ गडी बाद केले आहेत. यादरम्यान ३४ धावा खर्च करत ५ गडी बाद ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. त्याने या स्पर्धेत ३ वेळेस ५ गडी बाद करण्याचा पराक्रम केला आहे.
मुथय्या मुरलीधरन ( Muttiah Muralitharan) :
या यादीत दुसऱ्या स्थानी श्रीलंकेचा दिग्गज फिरकीपटू मुथय्या मुरलीधरन आहे. त्याने अनेक फलंदाजांना आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवले आहे. त्याच्या या स्पर्धेतील कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर, त्याने २४ सामने खेळत ३० गडी बाद केले आहेत. यादरम्यान ३१ धावा देत ५ गडी बाद ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. त्याला केवळ १ वेळेस ५ गडी बाद करण्याचा पराक्रम करता आला आहे.
अजंता मेंडिस (Ajanatha mendis) :
या यादीत तिसऱ्या स्थानी देखील श्रीलंकन खेळाडूने ताबा मिळवला आहे. माजी श्रीलंकन गोलंदाज अजंता मेंडिसने केवळ ८ सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याला २६ गडी बाद करण्यात यश आले आहे. १३ धावा खर्च करत ६ गडी बाद ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. त्याला २ वेळेस एकाच डावात ५ गडी बाद करण्याचा पराक्रम करता आला आहे.
सईद अजमल (Saeed Ajmal) :
या यादीत चौथ्या स्थानी पाकिस्तानचा दिग्गज फिरकीपटू सईद अजमलने स्थान मिळवले आहे. सईद अजमलने या स्पर्धेतील १२ सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने २५ गडी बाद केले आहेत. तर २६ धावा खर्च करत ३ गडी बाद ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे.
शाकिब अल हसन ( Shakib Al Hasan):
बांगलादेश संघातील मुख्य अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसन हा यादीत पाचव्या स्थानी आहे. शाकिब अल हसनने आशिया चषक स्पर्धेतील १८ सामन्यांमध्ये २४ गडी बाद केले आहेत. यादरम्यान ४२ धावा खर्च करत ४ गडी बाद ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. हा टॉप -५ गोलंदाजांमध्ये एकमेव खेळाडू आहे जो खेळताना दिसून येऊ शकतो. त्यामुळे शाकिब अल हसनला या यादीत सर्वोच्च स्थानी जाण्याची संधी असणार आहे.
काय वाटतं कुठला भारतीय गोलंदाज? टॉप ५ गोलंदाजांच्या यादीत प्रवेश करू शकतो? कमेंट करून नक्की कळवा.
