महाराष्ट्राने देशाला अनेक महान क्रिकेटपटू दिले आहेत. सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर असे अनेक खेळाडू सांगता येतील. पण स्वातंत्र्यानंतर त्या वेळच्या कठीण परिस्थितीत भारतीय संघाला विजयाची सवय लावली ती एका विजय नावाच्या खेळाडूने. हा खेळाडू सांगलीच्या एका शिक्षकाच्या आठ मुलांपैकी एक होता.
ही गोष्ट आहे विजय हजारे यांची. विजय हजारे हे नाव तुम्ही विजय हजारे ट्रॉफीच्या निमित्ताने ऐकले असेल. पण ज्यांच्या नावाने ही स्पर्धा भरवली जाते ते कोण आहेत हे आज तुम्ही वाचणार आहात. स्वतंत्र भारतातील भारतीय संघाचा पहिला कॅप्टन आणि भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर विजय मिळवून देणारा पहिला कॅप्टन अशी त्यांची ओळख आहे.



