व्हिडीओ : विराटच्या लै भारी बॅटिंग ट्रिक्स

व्हिडीओ : विराटच्या लै भारी बॅटिंग ट्रिक्स

भौ, विंडयाचा सध्याचा सगळ्यात भारी प्लेयर आहे विराट! असे आमच्या घराचे डॉन म्हणजे आमचे पिताश्री हो.. आम्हाला दर मॅचला सांगतात. त्यांच्या मते त्यांना विराटचा ड्राईव्ह  पाहून सचिनची आठवण होते. तर मंडळी, आमचे फादर हे डॉन ब्रॅडमन आहेत असं काही आमचं मत नाहीय. पण त्यांच्या मताचा आम्ही थोडाफार आदर राखतो. पण काही म्हणा, आम्हालाही विराटचे अग्रेशन फार आवडतं. त्याचे ड्राईव्ह आहेतच खास!!

तर त्याच्या बॅटिंग ट्रिक्सबद्दल बोलत आहोतच, तर आज आम्हाला एक व्हिडिओ सापडला आहे. त्यात विराट चक्क पळत्या टायरमधून बरोबर शॉट मारतोय. तर हा व्हिडीओ एम. आर. एफ.च्या जाहिरातीत घेतलाय. त्यामुळं खरा आहे का ट्रिक व्हिडिओ हे फक्त विराट आणि एमआरएफवालेच सांगतील, पण दोन प्लेयरला भेदून कव्हर्समधून चौकार मारणं विराटला शक्य आहे हे मात्र नक्की.