टी -२० विश्वचषक स्पर्धेसाठी विराट नव्हे तर 'या' फलंदाजांवर वीरूने दाखवला विश्वास, वाचा सविस्तर ..

टी -२० विश्वचषक स्पर्धेसाठी विराट नव्हे तर 'या' फलंदाजांवर वीरूने दाखवला विश्वास, वाचा सविस्तर ..

गतवर्षी झालेल्या आयसीसी टी -२० विश्वचषक (icc T20 world cup) स्पर्धेत भारतीय संघाला हवी तशी कामगिरी करता आली नव्हती. भारतीय संघाला थेट विजेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानलं जात होतं. मात्र भारतीय खेळाडू पूर्णपणे फ्लॉप ठरले होते. आता येत्या काही दिवसात आयसीसी टी -२० विश्वचषक २०२२ स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेपूर्वी भारतीय संघाने जोरदार तयारी करायला सुरुवात केली आहे. यावेळी भारतीय संघ नवीन कर्णधार आणि नवीन मुख्य प्रशिक्षकासह मैदानात उतरणार आहे. भारतीय संघाची जबाबदारी ५ वेळेस आयपीएलचे जेतेपद मिळवणाऱ्या रोहित शर्माकडे  (Rohit sharma) असणार आहे. दरम्यान ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वी माजी भारतीय फलंदाज वीरेंद्र सेहवागने (Virender Sehwag) विराट कोहलीच्या खेळण्याबाबत मोठे वक्तव्य केले आहे. 

 आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचा पहिला सामना पाकिस्तान संघासोबत पार पडला होता. या हाय व्होल्टेज सामन्यात भारतीय संघाचा दारुण पराभव झाला होता. त्यानंतर भारतीय संघ कमबॅक करेल असे वाटत असताना, न्यूझीलंड संघाने देखील भारतीय संघाला पराभूत केले होते. आता आगामी स्पर्धेत रोहित शर्मा नेतृत्व करणार आहे. तर रवी शास्त्री ऐवजी राहुल द्रविडवर (Rahul Dravid) संघाची जबाबदारी असणार आहे.

माजी भारतीय क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागचे असे म्हणणे आहे की, भारतीय संघाने टॉप -३ मध्ये बदल केला पाहिजे. गेल्या कित्येक वर्षांपासून विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करतोय. मात्र सेहवागचे असे म्हणणे आहे की, टॉप -३ मध्ये ईशान किशन, केएल राहुल आणि रोहित शर्मा यांनी फलंदाजी करावी . तर विराट कोहली कुठल्या क्रमांकावर फलंदाजी करेल याबाबत त्याने काहीच वक्तव्य केलं नाही.(Virender Sehwag statement on Virat Kohli)

वनडे आणि टी -२० क्रिकेटमध्ये विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करतो. मात्र गेल्या काही महिन्यांपासून त्याला फॉर्म गवसला नाहीये. कर्णधारपद सोडल्यानंतर त्याच्या फलंदाजीवर देखील प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. सेहवागने म्हटले की, "भारतीय संघाने डाव्या आणि उजव्या हाताच्या फलंदाजांसह मैदानात उतरायला हवं. मग तो केएल राहुल - ईशान किशन असो किंवा ईशान किशन - रोहित शर्मा असो."

तसेच नुकताच भारतीय संघात पदार्पण केलेल्या उमरान मलिकबाबत देखील सेहवागने मोठे वक्तव्य केले आहे. त्याचे म्हणणे आहे की, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमीसह उमरान मलिकला देखील भारतीय संघात स्थान दिलं पाहिजे.

टॅग्स:

rahul dravid

संबंधित लेख