क्रिकेट जगतात हल्ली क्रिकेट कमी आणि मैदानावरील इतर वाद जास्त गाजत असतात. कधी कधी हे वाद सर्वांना समजत असतात तर काही वाद हे सर्वमान्यांना कळत नाहीत. ४ एप्रिल रोजी पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान एक दिवशीय सामना खेळला गेला. आता तुम्ही म्हणाल त्या दोन देशांच्या मॅचसोबत आपल्याला काय घेणे देणे? तर हा वादच असा आहे की उद्या उठून आपल्या भारतीय टीमसोबत देखील घडू शकतो.
फेक फिल्डिंग म्हणजे काय? पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिकेच्या सामन्यात नेमकं काय घडलं?

पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान झालेल्या मॅचमध्ये फेक फिल्डिंगमुळे पाकिस्तानने हा सामना गमावला आहे. ज्यामुळे पाकिस्तानी भडकले आहेत. सुरुवातीला फेक फिल्डिंग काय असते हे जाणून घेऊया. फेक फिल्डिंगमध्ये खेळाडू हातचलाखीने आपल्या विरुद्धच्या खेळाडूला गोंधळात पाडतो. समोरचा खेळाडू याला बळी पडला तर त्याची विकेट गेलीच म्हणून समजा.
परवाच्या सामन्याबाबत बोलायचं तर पाकिस्तान हा सामना फक्त हरलाच नाहीतर त्यांचा अव्वल खेळाडू फखर जमान हा विश्वविक्रमापासून दूर राहिला आहे. पहिली बॅटिंग करताना दक्षिण आफ्रिकेने तब्बल ३४१ धावांचे आव्हान पाकिस्तानपुढे ठेवले. अतिशय कठीण वाटणारे हे आव्हान पाकिस्तानच्या फखर जमानने छोटेस करून ठेवले. फखर जमानने तुफान खेळी करत १९३ रन लुटले. पण १९३ वर खेळत असताना त्याला फेक फिल्डिंगमुळे आऊट करण्यात आले. विशेष म्हणजे त्यावेळी पाकिस्तान ३२१ धावांवर पोहचला होता. त्यांना विजयासाठी ३१ धावांची आवश्यकता होती.

हा स्कोर फखर जमानने कदाचित पूर्ण केला असता, कारण तो जबरदस्त बॅटिंग करत होता. पण ४९व्या ओव्हरवर पहिल्याच बॉलवर तो धाव घेण्यासाठी गेला तेव्हा एडीम मार्करने बॉल विकेटकिपर क्विंटन डी कॉककडे फेकला. पण डी कॉकने त्याच्याकडे येत असणारा बॉल समोरच्या फिल्डरकडे येत आहे असे इशाराने सांगितले. यामुळे धावत असणाऱ्या जमानचा गोंधळ उडाला, तो मागे वळून पाहू लागला आणि त्याचा धावण्याचा वेग मंदावला आणि डी कॉकने त्याला आऊट केले. अशा पद्धतीने नजर हटी आणि दुर्घटना घटी अशा पद्धतीने पाकिस्तानला पराभव बघावा लागला.
क्रिकेटला जेंटलमन्स गेम म्हटलं जातं पण या समजुतीला फाटा देणाऱ्या अशा अनेक घटना दाखवून देता येतील.
टॅग्स:
संबंधित लेख

या ५ कारणांमुळे आर अश्विन आहे भारतीय संघाच्या वाईस कॅप्टनसीसाठी परफेक्ट चॉईस...
२३ फेब्रुवारी, २०२३

जेव्हा अनिल कुंबळेने इंग्लिश गोलंदाजांना रडवत इंग्लंडमध्येच झळकावले होते शतक!! वाचा तो किस्सा..
११ ऑगस्ट, २०२२

हे आहेत वनडे क्रिकेटच्या एकाच डावात सर्वाधिक षटकार मारणारे टॉप ३ फलंदाज,एकमेव भारतीय फलंदाजाचा समावेश....
२५ जून, २०२२

'शरीर साथ देत नाही...' म्हणत भारतीय महिला संघातील 'या' क्रिकेटपटूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला केले राम राम
२२ फेब्रुवारी, २०२२