२०११ च्या क्रिकेट वर्ल्ड कपची फायनल आठवते? कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने खणखणीत सिक्स मारला आणि भारताने वर्ल्डकप जिंकला. संपूर्ण भारतात त्या दिवशी झालेला जल्लोष कोणीही विसरू शकत नाही. क्रिकेटप्रेमी असो वा नसो, लहान-मोठे स्त्री पुरुष सर्वजण त्यावेळी भावनिक झाले होते. सर्वांच्या लाडक्या सचिन तेंडूलकरचं स्वप्न सर्व संघांने मिळून पूर्ण केलं होतं.
आज ही आठवण काढायचे कारण म्हणजे ज्या बॅटने धोनीने तो विजयी षटकार मारला ती आजपर्यंत जगातली सर्वात महागडी बॅट ठरली आहे. लंडनमध्ये लिलावात त्या बॅटची किंमत वाचून तुम्ही अवाक व्हाल. जगातील सर्वात महागडी बॅट म्हणून तिची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बुकमध्येसुद्धा झाली आहे.






