२०११ सालच्या वर्ल्ड कप भारताने जिंकला होता. या मॅचच्या शेवटी सर्व खेळाडूंनी मैदानावर सचिनला मानवंदना दिली. सचिनच्या कारकिर्दीतला हा शेवटचा वर्ल्डकप होता. १०० कोटीहून अधिक लोक साश्रू नयनांनी हा सोहळा बघत होते. पण त्याच वेळी म्हणजे २०११ साली आयकर अधिकार्यांसमोर सचिनचे कर सल्लागार सचिन क्रिकेटर नाही तर तो 'अॅक्टर' आहे हे सिध्द करण्याच्या प्रयत्नात होते.
आपला सचिन, क्रिकेटचा देव सचिन -क्रिकेटर नाही तर तो एक 'अॅक्टर' आहे ही कल्पना पण चाहत्यांना सहन होणार नाही. पण ते सत्य होते. सचिनला 'अॅक्टर' ठरवण्याच्या मूळाशी होते आयकराचे एक कलम 80RR !










