भारतीय महिला क्रिकेट संघाचे सध्या चांगले दिवस सुरू आहेत. महिला क्रिकेटर या धडाकेबाज कामगिरी करत, 'छोरी भी छोरो से कम थोडी है' ही गोष्ट सिद्ध करत आहेत. याच गोष्टीचा अनुभव देणारी घटना म्हणजे ऑस्ट्रेलिया विरुद्ध सुरु असलेल्या टी ट्वेन्टी मालिकेत भारतीय खेळाडू शिखा पांडेने केलेली भन्नाट बॉलिंग.
ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात ऑसी संघाकडून बॅटिंग करत असलेल्या अलीसा हिली हिच्यासमोर बॉलिंगला आलेल्या शिखा पांडेने टाकलेल्या बॉलवर तिची विकेट पडली. बॉल थेट दांड्या उडवता झाला. याला लोकांनी चक्क बॉल ऑफ द सेंच्युरी ठरवून टाकले.
आधी दांडयांच्या फुटभर साईडला पडलेला बॉल स्विंग होऊन थेट दांडयांमध्ये घुसला. अलिसा हिलीला काही समजण्याच्या आत तिची विकेट पडली होती. या गोष्टीने भारतीय खेळाडूंना पण सुखद धक्का बसला. देशभर शिखच्या या अफलातून बॉलिंगचे कौतुक होत आहे. अनेकांनी शंभर वर्षात असा एखादा बॉल पडतो असेही याचे वर्णन केले.
