यो-यो टेस्टमुळे संपुष्टात येऊ शकते 'या' ३ खेळाडूंची कारकीर्द,..

यो-यो टेस्टमुळे संपुष्टात येऊ शकते 'या' ३ खेळाडूंची कारकीर्द,..

फिटनेस हा भारतीय खेळाडूंचा सुरुवाती पासूनच विक पॉइंट राहिला आहे. क्रिकेटमध्ये खेळाडूंना शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असण्याबरोबरच मानसिकदृष्ट्याही तंदुरुस्त असावे लागते. क्रिकेट विश्वात अनेक असे खेळाडू आहेत, जे आपल्या फिटनेसमुळे आणि वाढत्या वजनामुळे नेहमीच चर्चेत असतात. आता बीसीसीआयने योयो टेस्ट पुन्हा सुरू केली आहे. त्यामुळे काही खेळाडू आपल्या फिटनेसमुळे बाकावर बसताना दिसून येऊ शकतात. बोभाटाच्या या लेखात आम्ही तुम्हाला अशा काही खेळाडूंबद्दल माहिती देणार आहोत, जे योयो टेस्टमुळे बाहेर होऊ शकतात.

सरफराज खान :

देशांतर्गत क्रिकेटमध्ये धुमाकूळ घालणारा सरफराज खान या यादीत पहिल्या स्थानी आहे. त्याने रणजी ट्रॉफी स्पर्धेत जोरदार कामगिरी केली आहे. रणजी ट्रॉफी स्पर्धेतील ६ सामन्यांमध्ये त्याने ८५६ धावा केल्या आहेत. आपल्या फलंदाजीसह तो वाढत्या वजनामुळे देखील नेहमीच चर्चेत असतो. अनेक दिग्गजांचे म्हणणे आहे की, त्याला भारतीय संघात स्थान मिळवायचे असेल तर त्याला वजन कमी करावे लागेल. त्याचे वजन ७० च्या आसपास आहे. त्यामुळे तो योयो टेस्ट मध्ये फेल होऊ शकतो.

पृथ्वी शॉ:

या यादीत दुसऱ्या स्थानी आहे, आक्रमक फलंदाजी पृथ्वी शॉ. रणजी ट्रॉफी स्पर्धेत जोरदार कामगिरी करत,या खेळाडूने भारतीय संघात स्थान मिळवले आहे. त्याने रणजी ट्रॉफी स्पर्धेतील ६ सामन्यांमध्ये एकूण ५९५ धावा केल्या आहेत. तसेच आयपीएल स्पर्धेत देखील हा खेळाडू धावांचा पाऊस पाडत असतो. या खेळाडूची फलंदाजी शैली पाहून रवी शास्त्री यांनी, त्याला सचिन आणि सेहवागच्या फलंदाजीचा कॉम्बो असल्याचे म्हटले होते. 

रोहित शर्मा :

रोहित शर्माच्या फिटनेसचे देखील अनेक मिम सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जोरदार कामगिरी करतोय. भारतीय संघाचे नेतृत्व करत असलेल्या रोहितने यावर्षी खेळलेल्या ६ सामन्यांमध्ये ३२८ धावा केल्या आहेत. आता तो बॉर्डर गावस्कर ट्रॉफी खेळताना दिसून येणार आहे. मात्र रोहितच्या फिटनेसवर नेहमीच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते. त्यामुळे जर योयो टेस्टमुळे रोहितचा देखील पत्ता कट होऊ शकतो.

रोहित शर्मा सध्या भारतीय संघाचे नेतृत्व करतोय. तर पृथ्वी शॉ आणि सरफराज खान लवकरच भारतीय संघात खेळताना दिसून येऊ शकतात. त्यामुळे पृथ्वी शॉ आणि सरफराज खानला आपल्या फिटनेसवर मेहनत घ्यावी लागणार आहे.