जेव्हा युवराज देवाचे पाय पकडतो!!!

जेव्हा युवराज देवाचे पाय पकडतो!!!

भारतीय क्रिकेटप्रेमी ज्याला गॉड ऑफ क्रिकेट म्हणून ओळखतात तो आपला लाडका सचिन मैदानात उतरला आणि त्याची बातमी झाली नाही असे शक्य नाही. आपल्या फॅन्स प्रमाणेच इतर टीम मेट्स साठी तेंडुलकर प्रेरणास्थान आहेच. त्याने अनेक वर्ष भारतीय संघाच्या कुटुंबप्रमुखाची भूमिका बजावली आहे. त्यामुळे इतर सहकारी त्याला आदराने वागवतात यात काही आश्चर्य वाटत नाही.

या अशा वागणकीचा प्रत्यय आला काल झालेल्या IPL सामन्यात. सनराईजर्स हैदराबाद कडून खेळणाऱ्या युवराज सिंगने जेव्हा सामना संपल्यानंतर सचिनचे पाय पकडून आशीर्वाद घेतले.

यापूर्वीही युवराज  लार्डवर झालेल्या प्रदर्शनीय सामन्यात सचिनच्या पायापडला होता.

 

टॅग्स:

sachin tendulkarIPL

संबंधित लेख